स्मार्टफोन कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच(launched) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा आगामी स्मार्टफोन Vivo X200 FE या नावाने भारतात लाँच केला जाऊ शकतो. लाँचिंगपूर्वीच अनेक टिपस्टिरने या स्मार्टफोनच्या अपेक्षित फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. तसेच हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याबाबत देखील अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

Vivo X200 FE भारतात Vivo X200 Pro Mini ची जागा घेणार आहे. Vivo X200 Pro Mini भारतात ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच(launched) करण्यात आला होता, ज्यामध्ये बेस आणि प्रो व्हेरिअंट्सचा समावेश होता. Vivo X200 Pro Mini नंतरचे मॉडेल डिसेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आले होते.
आता लवकरच या सिरीजमधील Vivo X200 Pro Mini आणि X200 Ultra हे दोन स्मार्टफोन देशात लाँच होणार आहेत, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी X200 Pro Mini च्या ऐवजी FE व्हेरिअंट लाँच करू शकते. हा स्मार्टफोन भारतात X200 Ultra सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत माहिती दिली नाही.
Smartprix च्या एका रिपोर्टनुसार, Vivo X200 FE स्मार्टफोन जून किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा हँडसेट देशात Vivo X200 Pro Mini ची जागा घेऊ शकतो.
Vivo X200 सीरीजच्या आगामी मॉडेलमध्ये Dimensity 9400e प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, ही एक अनअनाउंस्ड चिप आहे आणि Dimensity 9400 चिपसेटचे बदललेले वर्जन असू शकते. विशेष करून Vivo X200 Pro Mini मध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. चीनमध्ये, या हँडसेंटची किंमत 12GB+256GB व्हेरिअंटसाठी CNY 4,699 म्हणजेच सुमारे 56,000 रुपये आहे.

Vivo X200 FE मध्ये 6.31-इंच 1.5K LTPO OLED स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल मेन रियर सेंसर आणि 50-मेगापिक्सल टेलीफोटो शूटर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर मिळू शकतो. यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. मात्र बॅटरीबद्दल अद्याप माहिती नाही.
Gizmochina च्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कथित Vivo X200 FE चीनमध्ये Vivo S30 Pro Mini म्हणून लाँच होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये MediaTek Dimensity 9400e प्रोसेसर असेल. चिपसेटची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही आणि तो कथित OnePlus Ace 5 Racing Edition आणि अपेक्षित Realme स्मार्टफोनमध्ये देखील वापरला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
“आम्ही जिवंत आहोत…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील कपलचा तो व्हायरल व्हिडिओ…
पत्नीला रील्स बनवण्याचा नाद, पुरुषांच्या कमेंट्सचा पतीला राग, दारुच्या नशेत लाथ घातली, अन्….
एसटीच्या तिकीटांमधील सवलत महिलांना महागात पडण्याची भीती, धक्कादायक बातमी समोर