भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण(chess) आला आहे की, FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झाले आहे. कारण अंतिम फेरीत दोनही खेळाडू भारतीय आहेत, अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा प्रतिभा दिव्या देशमुख.

ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने केली कमाल
गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये पराभूत केलं. सामन्याच्या सुरुवातीच्या दोन डावांमध्ये दोघींनीही ड्रॉ खेळले. त्यानंतर टायब्रेकच्या 15-15 मिनिटांच्या(chess) डावांमध्ये देखील 1-1 अशी बरोबरी झाली. 10-10 मिनिटांच्या पुढील डावांमध्ये लेईने पहिला डाव जिंकून आघाडी घेतली, पण हम्पीने दुसरा डाव जिंकून सामना पुन्हा बरोबरीत आणला. नंतरच्या टायब्रेक सेटमध्ये हम्पीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला. त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता, पण हम्पीने तो डावही जिंकून थेट अंतिम फेरी गाठली.
दिव्या देशमुखची धमाकेदार कामगिरी
दुसरीकडे, बुधवारी दिव्या देशमुखने माजी विश्वविजेती चीनच्या झोंगयी टॅन हिला 1.5-0.5 अशा फरकाने हरवून फाईनलमध्ये प्रवेश केला. या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे (chess) भारताला पहिल्यांदाच FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार हे निश्चित झालं आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे की, ही ट्रॉफी अनुभवी हम्पी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल.
महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी देखील पात्रता
या दोघी भारतीय खेळाडूंनी आता पुढील वर्षी होणाऱ्या महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठीही आपली जागा निश्चित केली आहे.
विजेत्याला 41.6 लाखांचे पारितोषिक!
FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये होणार असून, कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात ही ऐतिहासिक लढत रंगणार आहे. हा अंतिम सामना शनिवार, 26 जुलै रोजी सुरू होईल. पहिला डाव – 26 जुलै आणि दुसरा डाव – 27 जुलै रोजी असले, आणि जर टायब्रेक्स झाला तर 28 जुलै (सोमवार) रोजी खेळवले जातील.
विजेत्या खेळाडूला $50,000 (सुमारे ₹41.6 लाख रुपये) मिळतील.
उपविजेत्याला $35,000 (सुमारे ₹29.1 लाख रुपये) दिले जातील.
हेही वाचा :
बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट
टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऋषभ पंत दुखापतीमुळे एवढ्या महिन्यांसाठी संघातून बाहेर
वयाने लहान मुलांना Date का करत आहेत मुली? रिलेशनशिप सिक्रेटचा खुलासा