तुम्हीसुद्धा अशापद्धतीने चपाती बनवता? वेळीच व्हा सावधान नाहीतर होऊ शकतो कॅन्सर

प्रत्येकाच्या घरामध्ये चपाती किंवा भाकरी ही बनवली जाते.(meals)चपाती किंवा भाकरीशिवाय अनेकांचे जेवण पूर्णच होत नाही. चपाती बनवता विशेष काळजी घेणं खूप गरजेचे आहे. चपाती किंवा भाकरी आधी तव्यावर भाजली जाते. त्यानंतर ही चपाती टम्म फुगावी यासाठी गॅसच्या आचेवर शेकली जाते. पण हे असं करणं आरोग्यासाठी घातक आहे. असं करणं का योग्य नाही हे आपण जाणून घेणार आहोत…

आधीच्या काळात चुलीवर भाकरी बनवताना आपण आधी ती तव्यावर भाजून घ्यायचो त्यानंतर चुलीबाहेर कोळसा काढून ती भाकरी त्या कोळश्यावर ठेवून टम्म फुगवायचो. (meals)हल्ली अनेक महिला याच पद्धतीचा वापर करतात आणि गॅसच्या आचेवर चपाती भाजतात. चपाती केल्यानंतर ती तव्यावर भाजली जाते त्यानंतर टम्म फुगवण्या यासाठी गॅसच्या आचेवर ठेवली जाते. अशाप्रकारच्या गरमा गरम चपाती खाणं अनेकांना खूप आवडते.

पण चपाती करण्याची ही पद्धत आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. अशा प्रकारे तयार केलेली चपाती खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. एका संशोधनानुसार, जेव्हा अशा प्रकारे चपाती बनवली जाते तेव्हा त्यात HCA म्हणजे हेटेरोसायक्लिक अमाइन्स आणि PAH म्हणजे पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स ही हानिकारक रसायने तयार होतात. ज्यामुळे कॅन्सरसारख्या समस्या निर्माण होतात.

चपाती बनवताना जर तुम्ही ती पूर्णपणे तव्यावरच भाजली तर ती आरोग्यासाठी घातक ठरत नाही. अशाप्रकारे तयार केलेली चपाती खाल्ल्यामुळे तुम्हाला कॅन्सर देखील होत नाही.(meals) त्यामुळे यापुढे चपाती बनवत असताना तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि इतर कोणी जर अशापद्धतीने चपाती बनवून खात असतील तर त्यांना देखील वेळीच सावध करा.

हेही वाचा :

नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!

अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल

बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल