जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणे ही सवय आरोग्यासोबतच मानसिक शांती,(eating)आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक नाती यांना हानिकारक आहे.वास्तुशास्त्रानुसार, जेवणाचा वेळ पवित्र असून त्यावेळी मन, शरीर आणि आत्मा यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.मोबाईल आणि टीव्हीचा निळसर प्रकाश आणि इलेक्ट्रॉनिक लहरी घरातील सकारात्मक ऊर्जा बिघडवतात.आजकाल अनेकांना जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची सवय असेत. काही लोकांचं तर मोबाईल किंवा टीव्ही सुरु नसेल तर जेवणच होत नाही असं म्हणतात. अनेकांच्या मताप्रमाणे, हा एक रिलॅक्स होण्याचा किंवा मजा घेण्याचा मार्ग आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का ही सवय केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांसाठीही हानिकारक ठरू शकतं?

वास्तुशास्त्रानुसार, जेवणाचा काळ ही एक पवित्र वेळ मानली जाते. यावेळी मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन खूप महत्त्वाचं असतं. मात्र जर तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर लक्ष देत असाल(eating), तर अन्न नीट न पचणं, मन अस्वस्थ होणं आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणं सुरू होतं. यावेळी नकळत तुमच्या हातून काही चुका घडतात, या चुका कोणत्या आहेत ते पाहूयात.मोबाईल आणि टीव्हीमधून येणारा निळसर प्रकाश आणि इलेक्ट्रॉनिक लहरी घरातल्या सकारात्मक ऊर्जेला थांबवतात. जर हे जेवणाच्या टेबलाजवळ असतील तर घराचं संपूर्ण एनर्जी बॅलन्स बिघडू शकतो. त्यामुळे जेवताना मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. शक्य असेल तर डायनिंग एरियामध्ये टीव्ही ठेवू नका.

जेव्हा तुम्ही जेवत असताना टीव्ही किंवा मोबाईल पाहता, तेव्हा लक्ष अन्नापेक्षा दुसऱ्या गोष्टींवर जातं. त्यामुळे एकाग्रता कमी होते आणि निर्णयक्षमता देखील ढासळते. याचा परिणाम रोजच्या कामकाजावर होतो आणि चुकीचे निर्णय होऊ शकतात. जेवताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. शांत चित्ताने आणि मनापासून जेवा. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि विचारशक्ती सुधारते.वास्तुशास्त्रानुसार, जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं ही लक्ष्मीमातेच्या कृपेपासून दूर जाण्याचं कारण ठरू शकतं. यामुळे हळूहळू घरात आर्थिक अस्थिरता, पैसा न टिकणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करा, आभार माना आणि श्रद्धेने पहिला घास घ्या.(eating) यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते.प्रत्येक जण जर जेवताना आपापल्या मोबाईलमध्ये पाहत असेल तर घरातील संवादच संपतो. वास्तुशास्त्र सांगतं की, जेवणाचा काळ हा नात्यांना बळकट करण्यासाठी असतो. पण स्क्रीनमुळे हा वेळ गमावल्यास कुटुंबात भावनिक अंतर वाढू शकतं. खाण्याच्या वेळी सर्वांनी एकत्र बसून बोलावं, हास्य-विनोद करावा, मुलं आणि ज्येष्ठांना वेळ द्यावा. यामुळे घरात प्रेम आणि समाधान टिकून राहतं.
हेही वाचा :
नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल