कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…

काही वर्षांपूर्वी जगभरात कोरोना(Corona) विषाणू पसरला होता. जगभरातील सर्वच देशांना या विषाणूचा मोठा फटका बसला आहे. कोरोना काळात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. जगभरातील सर्वच देशांमध्ये लोकडाऊन लावण्यात आले होते. या धोकादायक विषाणूमुळे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कोरोना लस देण्यात आली.

मात्र कोरोनाच्या(Corona) लसीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत झाल्याचे दिसून आले. कोरोनानंतर हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काहींना चालताना तर काहींना झोपेत सुद्धा हृदयविकाराचा झटका येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढल्यामुळे काही धक्कादायक दावे सुद्धा करण्यात आले. कोरोना लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याचा अनेकांनी दावा केला आहे.

कोरोनाच्या(Corona) लसीकरणामुळे आरोग्यासंबंधित आजार वाढत असल्याचे अनेकांना वाटते. यावर आयसीएमआर आणि एम्सच्या अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे.काही दिवसांआधी देशात अशी चर्चा होती की कोविड-19 लस घेतल्यानंतर अनेक तरुणांचा मृत्यू झाला. यामुळे सगळीकडे अफवा आणि भीती पसरत होती. त्यामुळे भारतातील दोन सगळ्यात मोठ्या वैद्यकीय संस्था आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आणि एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, कोविड लस आणि अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे कोणताही थेट संबधं नाही.

आयसीएमआर-एम्सने राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेच्या सहकार्यानी अहवाल तयार करत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचे नमुने घेण्यात आले. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 दरम्यान या लोकांचा अचानक मृत्यू झाला होता. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंमुळे सर्वच लोक घाबरले आहेत. हे सर्व चालू असतानाच आयसीएमआर आणि एम्सकडून अहवाल सादर करण्यात आला. तसेच मागील 40 दिवसांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे. या तरुणांच्या मृत्यूचे कारण कोरोना लस मानले जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देशातील अनेक एजन्सींद्वारे अचानक मृत्यूच्या प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे, ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की कोविड-19 लसीकरण आणि देशातील अचानक मृत्यूच्या बातम्यांमध्ये थेट संबंध नाही.अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, तरुणांचा मृत्यू नुवंशिकता, जीवनशैली, पूर्व-अस्तित्वातील आजार आणि कोविडनंतरच्या गुंतागुंतीसह विविध कारणांमुळे होण्याची शक्यता आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)
लस सुरक्षित आहे का?

होय, कोविड-19 लसींची चाचणी अत्यंत कठोरपणे केली गेली आहे आणि ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे WHO म्हणते.

गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता किती आहे?

गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत. जर तुम्हाला काही गंभीर लक्षणे दिसली, जसे की श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे किंवा खूप जास्त ताप येणे, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या, असे WHO च्या वेबसाईटवर नमूद केले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना भकास करून, शक्ती पीठ रस्त्यांचा विकास नको

महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नोव्हेंबरपर्यंत शनिच्या वक्रिय गतीमुळे ‘या’ राशींना होणार फायदा