यांना गुगल पण चुकीचे सांगतो CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार?

कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. (Kangana Ranaut) त्यामध्येच साैरभ दासबद्दल अत्यंत मोठा दावा कंगनाने केला. आता त्यावर साैरभ दास याने उत्तर देत मोठी टीका केली.

कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगना राणावत सतत या आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. परत कॉकरोच जनता पार्टीवर कंगनाने निशाणा साधला. कंगनाा राणावतने सीजेपीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास याच्यावर निशाणा साधत म्हटले की, तो विद्यार्थी नाही तर पत्रकार आहे. यावर आता साैरभ दास याने उत्तर दिले. साैरभ दास याने म्हटले की, मी विद्यार्थी नाही पण मी स्टूडेंट ऑफ लाईफ आहे आणि कंगनाने पण हे व्हायला पाहिजे. कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधत त्याने पुढे म्हटले की, कंगना यांना त्यांचे गुगल देखील चुकीची माहिती देतो. मी 28 चा नाही तर 27 वर्षाचा आहे.

मी विद्यार्थी नाही. मी पत्रकार आहे. मी कधीच विद्यार्थी असल्याचा दावा केला नाही. मी स्टूडेंट ऑफ लाईफ आहे आणि प्रत्येकाने ते होणे आवश्यक आहे.तसे सांगायचे झाले तर आपण पुढे गेल्यानंतर आपली समज अधिक विकसित होते. कोणाचे वय जास्त असले तरीही स्टूडेंट ऑफ लाईफ नाही, जर तो शिकत नसले तर (Kangana Ranaut) त्याचे ज्ञान कधीच जाणार नाही. कंगना यांना समजले पाहिजे की, त्यांनी स्टूडेंट ऑफ लाईफ बनले पाहिजे. कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातील वाद वाढत आहे.

कंगना राणावतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारले होते. कंगनाने म्हटले होते की, या व्यक्तीबद्दल गूगल करा तुम्हा कळेल की, हा 28 वर्षाचा आहे. तो विद्यार्थी असण्याचा दावा करत आहे तो समजण्यापलीकडे आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. (Kangana Ranaut) मात्र, कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टीत एक वेगळीच चमकम रंगली आहे.सतत दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कंगना राणावत हिने जंतर मंतरवरील आंदोलनावेळी नक्की काय तिथे सुरू होते हे सांगितले. अभिजीत दिपकेवरही टीका करताना कंगना राणावत दिसली. कालच अभिजीत दिपके याने कंगना राणावत हिच्यावर टीका केली.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?