प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण…

स्वतःच्याच कारमध्ये अभिनेत्याचाच भयानक अवस्थेत आढळला(car) मृतदेह…, काय आहे अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण? अभिनेत्याला पोलिसांनी काय केलेली अटक? त्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साउथ कोरियन अभिनेता सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची माहिती समोर आली आहे. 3 ऑगस्ट रोजी सॉन्ग यंग-क्यू (car)त्याच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळला. अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सॉन्ग यंग-क्यू सर्वत्र चर्चेत होता. कारण अभिनेता दारू पिऊन ड्राईव्ह करत होता. अशात अचानक सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची माहिती समोर आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

सॉन्ग यंग-क्यू यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी होती. अशात सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची बातमी कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सॉन्ग यंग-क्यू याने ‘बिग बेट’, ‘ह्वारांग’, ‘हॉट स्टोव लीग’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमांशिवाय अभिनेता दुसऱ्या कोणत्या कोरियन सिनेमाचा भाग नव्हता. स्थानिक वृत्तसंस्था कोरियाबूनुसार, अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही, परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीने अभिनेत्याला त्याच्या गाडीत (car)मृतावस्थेत पाहिलं, असं म्हटलं जात आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी, अभिनेत्याला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सॉन्ग यंग-क्यू याच्या अडचणी खूप वाढल्या. अभिनेत्याच्या बाबतीत असं सांगितलं जात होतं की, त्याला स्वतःचे अनेक प्रोजेक्ट्स गमवावे लागले होते आणि त्याला अनेक भूमिकांमधूनही काढून टाकण्यात आलं होतं.

अभिनेत्याला झालेली अटक
दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर, अभिनेत्याची चाचणी करण्यात आली आणि त्यात त्याच्या रक्तात 0.08 टक्के अल्कोहोल असल्याचं आढळून आलं. सॉन्ग यंग-क्यू याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

कार बंद पडल्यास ‘या’ ट्रिक फॉलो करा, जाणून घ्या
पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, विष्णूंच्या आशीर्वादाने भरुन जाईल तुमची झोळी
मालिकेतून प्रेरणा मिळाली, ६ नोकऱ्या सोडल्या, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS संगीता कालिया यांचा प्रवास