‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचा साखरपुड्याचा व्हायरल व्हिडीओ! (engagement)इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सूरज एका मुलीला पाहायला जातो, प्रेमात पडतो आणि थेट साखरपुडा होतो… पण या सगळ्यामागे दडलेलं होतं एक भन्नाट ट्विस्ट! व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज सुटाबुटात तयार होऊन, आपल्या बहिणीसोबत मुलीच्या घरी पोहोचतो. मुलगी त्याला पाणी देते, नजरानजर होते आणि क्षणार्धात दोघं प्रेमात पडतात.
त्यानंतर दोघांचा साखरपुडा होतो – अंगठी देणं-घेणं, आनंदी चेहेरे… हे सर्व पाहून चाहतेही भारावून गेले. पण,(engagement) व्हिडीओच्या शेवटी खुलासा होतो की हे सगळं फक्त एक स्वप्न होतं! व्हिडीओच्या शेवटी सूरज झोपेतून उठतो आणि सर्वांचा भ्रमनिरास होतो. चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत – “आम्हाला तर खरंच वाटलं होतं!”, “गुलिगत धोका दिलास सूरज!”
View this post on Instagram
अशा प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(engagement)सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’ नंतर ‘झापुक झुपूक’ सिनेमातून प्रमुख अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्र
हेही वाचा :