जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. याशिवाय शरीरावर अनावश्यक चरबी(fat) वाढण्यास सुरुवात होते, ज्यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात.वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत.
मात्र ट्रीटमेंट केल्यानंतर वाढलेले वजन कमी होण्यासोबतच शरीराला हानी पोहचण्याची सुद्धा शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीनशेक किंवा वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.
वजन कमी करताना आहारात कोणत्याही चुकीच्या प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी आहारात घरगुती आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. महिनाभरात वजन कमी करण्यासाठी आहारात बडीशेप, अळशी, मेथी दाणे, चिया सीड्स इत्यादी अनेक पदार्थाचे सेवन केले जाते(fat). म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात दालचिनी आणि मधाचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दालचिनी आणि मध आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
दालचिनी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी मधाचे पेय अतिशय प्रभावी ठरते. वाढलेले वजन नैसर्गिकरित्या कमी करावे. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचून आरोग्य बिघडू शकते.
दालचिनी मधाचे पाणी कसे तयार करावे:
दालचिनी मधाचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. टोपातील पाणी गरम झाल्यानंतर त्यात दालचिनीचा बारीक तुकडा टाकून पाणी व्यवस्थित उकळेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या(fat). तयार केलेल्या पाण्यात मध टाकून सेवन करावे. या पाण्याचे सकाळी उठल्यानंतर महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय चयापचय क्रिया वेगवान होईल.
मध दालचिनीचे पाणी कधी प्यावे:
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात मध दालचिनीचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे साथीच्या आजारांपासून सुटका मिळते. याशिवाय सर्दी, खोकला झाल्यास मध दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी दालचिनी मधाच्या पाण्याचे सेवन करू शकता. याशिवाय दिवसभर भूक नियंत्रणात राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :