दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार

आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळी स्थितीचा सामना करत असलेला बळिराजा सध्या अडचणीत आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातात. सध्यातरी हा हप्ता ऑक्टोबरच्या अखोरीस किंवा नोव्हेंबर २०२६ मध्ये, दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला एकूण ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाते. (Farmers) यापूर्वीचा २३वा हप्ता २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता. पुढील हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी, आधारशी जोडलेले बँक खाते आणि जमिनीची पडताळणी यांची स्थिती तपासून घेणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया ओटीपी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने करता येते. आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळत (Farmers) असल्यास अधिकृत पीएम किसान पोर्टलवरून ई-केवायसी पूर्ण करता येते.

आधारशी मोबाइल क्रमांक जोडलेला नसल्यास जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जाऊन बोटांच्या ठशांद्वारे बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करता येते. (Farmers) याशिवाय बँक खाते आधारशी जोडलेले असणे, DBT सक्रिय असणे आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण असणेही महत्त्वाचे आहे. यापैकी आवश्यक बाबी अपूर्ण असल्यास हप्त्याच्या वितरणात अडथळा येऊ शकतो.

असे तपासा पीएम किसान योजनेचे Beneficiary Status
१. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in उघडा.

२. होमपेजवरील Farmers Corner विभागात जाऊन Know Your Status हा पर्याय निवडा.

३. आपला पीएम किसान नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा.

४. नोंदणी क्रमांक आठवत नसल्यास Know Your Registration Number या पर्यायाचा वापर करून नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने तो मिळवा.

५. नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.

६. स्क्रीनवर दिसणाऱ्या तपशिलांमध्ये eKYC Status, Land Seeding आणि Aadhaar Bank Seeding Status या तिन्ही बाबी तपासा. या प्रत्येकासमोर YES आहे का, हे पाहा.

ई-केवायसीची स्थिती अपूर्ण असल्यास अधिकृत पोर्टलवरील e-KYC पर्यायातून प्रक्रिया पूर्ण करा. मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला नसल्यास जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरची मदत घ्या.

हेही वाचा : 

संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दुष्काळाच्या कक्षेत समावेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर

कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ