हैदराबादमधील आघाडीच्या तेलुगू वृत्तवाहिनीच्या महिला अँकरचा(residence) राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्री महिला पत्रकाराने पंख्याला लटकून आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिला पत्रकाराच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांनी मुलीच्या आत्महत्येसाठी एका व्यक्तीला जबाबदार धरले आहे, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

स्वेच्छा वोटारकर (वय वर्ष ४०) असे महिला पत्रकाराचे नाव आहे.(residence) शुक्रवारी रात्री उशिरा तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. स्वेच्छाच्या वडिलांना मुलीने आत्महत्या केली असल्याचं कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. एका व्यक्तीवर त्यांचा संशय आहे. त्या व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे मुलीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं.
भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी महिला पत्रकाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली आहे. ‘स्वेच्छा वोटारकर यांच्या दुर्देवी निधनाचे वृत्त ऐकताच दु:ख झाले.(residence) ती एक निर्भय पत्रकार आणि लेखिका होती. माझ्याकडे बोलण्यासाठी आता शब्द नाहीत’, असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.
केटी रामाराव पोस्टमध्ये म्हणाले, ‘माझी ही पोस्ट वाचणाऱ्यांनो, जर तुम्हाला जीवन जगणं कठीण वाटत असेल तर, कृपया प्रोफेशनलशी संपर्क साधा. तसेच त्यांच्याकडून मदत घ्या. मदतीसाठी संकोच करू नका. जीवन जगण्यासाठी आहे, आपल्या अवती भोवती आधार असतो. आत्महत्या हा एकमेव पर्याय नसतो’, असं म्हणत त्यांनी सल्ला दिला.
हेही वाचा :
वीज दर कमी नव्हे तर आणखी वाढणार
धावत्या बाईकवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स; VIDEO viral
येथे तीन दिवसांचा विक ऑफ, केवल चार दिवसच काम करा, कुठे लागू झाला हा नियम पाहा