अनेक दहशतवादी हल्ल्यांतून(attacks) बोध घेत इंग्लंडने ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. सामान्य नागरिकांनी त्यासाठी लढा दिला. त्याकरिता जनजागृती महत्त्वाची ठरली.
भारतातील महत्त्वाच्या शहरांसारखा इंग्लंड देश सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच विविध हिंसक विचारधारेच्या दहशतवादी कृती घडवून आणणाऱ्या संघटना आणि संस्थांच्या रडारवर राहिलेला आहे. वेळोवेळी शहरांमध्ये झालेल्या दंगली असोत की चाकू अथवा बॉम्ब अशा साधनांनी करण्यात आलेले दहशतवादी हल्ले(attacks), इंग्लंडच्या एकूण परिस्थितीत हिंसक कारवायांपासून बचाव करण्यासाठी मोठी धडपड चाललेली दिसते.
लंडनसारखं शहर अनेकदा दहशतवादी हल्ल्यांच्या संकटाला बळी पडलं आहे. मात्र, असं असूनही विविध दहशतवादी हल्ले झाल्यानंतर इंग्लंडने त्यापुढील अशा अनेक घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. दहशतवादी हल्ल्यांवर अंकुश आणला. मात्र, हे कसं घडलं याचा लेखाजोखा आणि शासकीय धोरणं ते अगदी शेवटच्या पातळीवर सामान्य नागरिकांनी केलेली तयारी, याकडे पाहणं फार रंजक आहे.
जगातील कोणतेही देश दहशत व दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटलेले नसताना इंग्लंडने मात्र काही प्रमाणात अशा घटनांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात विविध शहरांमध्ये चाकूचा धाक दाखवून किंवा तरुण मुलांकडून विविध मार्गांनी दहशतवाद व त्याचा अवलंब केल्याची एखाद दुसरी घटना ऐकिवात येतेच.
मात्र, त्यापलीकडे पाहिलं असता इंग्लंडने आपल्या भूमीवर घडणाऱ्या दहशतवादी कारवायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लावला आहे, असं दिसून येतं. अर्थात दहशतवाद कशाला म्हणणार, याची व्याख्या एकच एक नसली, तरी मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या हिंसक कारवाया थांबवण्यात यंत्रणेला यश आल्याचं दिसतं. मात्र, ते यश फक्त शासन यंत्रणेचंच नसून त्यात सामान्य नागरिकांचा आणि त्याच बरोबरीने तंत्रज्ञानाचाही वाटा महत्त्वाचा आहे.
इतर कुठल्याही देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना संशयास्पद गोष्टींपासून सतर्क राहण्याची सूचना केली जाते. हल्ले रोखण्यासाठी असे नियोजन करणाऱ्या संघटनांच्या प्रयत्नांना पहिल्या पातळीवरच रोखण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, असे हल्ले करण्यासाठी सहसा संघटना टेहळणी किंवा अशा ठिकाणांना भेटी देऊन त्या जागांचं अवलोकन करून हेरगिरी करत असतात.
हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या पातळीवर जाण्यापूर्वीच अशा संघटनांना याच पातळीवर रोखण्याचा प्रयत्न केला जातो. वर्दळीच्या ठिकाणी गस्त ठेवणं, हालचाली न्याहाळणं आणि तंत्रज्ञांची मदत घेऊन संशयास्पद हालचाली रोखण्यावर लक्ष दिलं जातं.
हेही वाचा :
कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यानं सांगलीचा प्रश्न निर्माण झाला?
विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक
हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं