माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी चाचपणी केल्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांच्या ‘स्वाभिमानी’ला जाग आली आहे. (Former) आगामी काळात कोणत्याही सत्तेच्या आमिषाला बळी न पडता केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार शेट्टी यांनी करून ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षांतर्गत बदलही केल्याने ‘स्वाभिमानी’ने आगामी रणनीती स्पष्ट केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात झाली. त्या बैठकीत माजी खासदार शेट्टी यांनी पक्षाची आगामी भूमिका जाहीर केली. या बैठकीत संघटनात्मक स्थिती आणि पक्षविस्तारावर चर्चा करण्यात झाली. (Former) तसेच पक्षांतर्गत बदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला. राज्यातील बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेऊन स्वाभिमानी पक्षाची भविष्यातील रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली. शेट्टी यांनी या बैठकीत आगामी काळात कोणत्याही सत्तेच्या आमिषाला बळी न पडता केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार करत ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.

दरम्यान, शरद जोशी यांच्या ‘शेतकरी संघटने’तून चळवळीला सुरुवात केलेल्या माजी खासदार शेट्टी यांनी अंतर्गत मतभेदांमुळे ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ आणि ‘स्वाभिमानी पक्ष’ स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित साखर कारखानदारांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी राजकीय ओळख निर्माण केली.(Former) त्यामुळे २००१ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यापासून सुरुवात केल्यावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. २००९ मध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकत लोकसभेत प्रवेश केला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’मध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले. शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने २०१७ मध्ये ‘एनडीए’तून बाहेर पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीशी जुळवून घेतले. ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत देण्याच्या निर्णयामुळे मतभेद झाल्याने २०२२ मध्ये त्यांनी महाविकास आघाडीशी संबंध तोडले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांपासून समान अंतर राखत त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यानंतर ‘परिवर्तन महाशक्ती’ ही तिसरी आघाडी उभारून निवडणूक लढविली. त्यामध्ये अपयश आले. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.

माजी खासदार शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी’मध्ये अंतर्गत बदल करून नवीन नेत्यांच्या हाती पक्ष आणि संघटनेची धुरा दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नंदूरबार जिल्ह्यातील घनश्याम चौधरी यांची, तर स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुण्यातील प्रकाश बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संंघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी मयूर बोर्डे आणि स्वाभिमानी पक्षाच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सूर्यभान जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?