गणेशोत्सव(Ganeshotsav) तोंडावर आलेला असतानाच अनेकांनीच गणरायाच्या आगमनासाठी आरास नेमकी कशी असेल यासाठी अनेक कल्पना सुचवण्यास सुरुवात केली आहे. काही मंडळींनी कृत्रिम फुलांच्या सजावटीसाठीचा पर्यायसुद्धा निवडला आहे. मात्र हा पर्याय आता फार काळ विचारात ठेवता येणार नाही. थोडक्यात गणपतीच्या सजावटीसाठी आता नवा पर्याय शोधावाच लागणार कारण, राज्यात कृत्रिम, प्लास्टीक फुलांवर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा खुद्द फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत केली.

राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टीक- कृत्रिम फुलावर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली(Ganeshotsav). महेश शिंदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्यात कृत्रिम आणि प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या खऱ्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फूल उत्पादक शेतकऱ्आंना याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी शासनापुढं काही उदाहरणं ठेवत अलिकडच्या काळात बहुतांश कार्यक्रम, समारंभ, मंगल कार्यालय,मंदीरं, उत्सवात प्लास्टीकच्या कृत्रिम बनावटीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा फुलांच्या वापरामुळं शेती करणारे जवळपास 20 ते 25 टक्के शेतकरी अडचणीत आले असून त्यांचा सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय संकटात आला आहे. ज्यामुळं शेतकऱ्याच्या पोटावर पाय आणणारी ही कृत्रिम फुलांची विक्री बंद करण्याची मागणी जोर धरताना दिसली.

कृत्रिम फुलांचा वापर आल्यानं फूलशेती संकटात आल्यास त्याचा थेट परिणाम मध उत्पादनावरही होईल असं कारण अधोरेखित करत प्लास्टीक फुलांवर तातडीने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. याच धर्तीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांचा शुक्रवारी आझाद मैदानात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत कृत्रिम- प्लास्टिक फुलांवर बंदी घाण्याचा निर्णय झाल्याची माहिती गोगावले यांनी दिली. दरम्यान बंदीबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असंही अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं.
हेही वाचा :
‘ही’ आहे शाहरुख खानच्या मुलाची गर्लफ्रेंड; संपत्ती जाणून व्हाल थक्क
आसामच्या ‘या’ गावाला म्हटले जाते ब्लॅक मॅजिकची राजधानी; काय आहे यामागचं रहस्य? ऐकाल तर हैराण व्हाल
ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग ते आणीबाणी … उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर समोर