धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! 

आयपीएलच्या 29 व्या सामन्यामध्ये मुंबई आणि चेन्नई(live cricket streaming) हे दोन मोठे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आणि पहिल्या चेंडू पासून किंबहुना नाणेफेक झाल्या क्षणापासून या सामन्याची रंगत वाढतच गेली. एल क्सालिको म्हणून गणल्या गेलेल्या या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत होती. अखेर चेन्नई सुपरकिंग्स या संघानं घरच्याच मैदानावर अर्थात मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मुंबईच्याच संघाला पराभूत केलं आणि यंदाच्या IPL 2024 मधील चौथा पराभव पचवत संघाचे खेळाडू तंबूत परतले.

वानखेडेवर दोन वेळा पराभूत झालेल्या मुंबईच्या(live cricket streaming) संघाला सध्या Points table मध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावं लागत असून, हार्दीक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या या संघाची वाट आता बिकट दिसू लागली आहे. संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीसमवेत आता हार्दिकच्या नेतृत्त्वंक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तीन षटकांमध्ये 43 धावा देणाऱ्या हार्दिकला याच सामन्यातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीनं धावांचा मारा करत हतबल केल्याचं पाहायला मिळालं. अखेरच्या क्षणी वाढलेल्या याच 24 धावांनी चेन्नईचं पारडं खऱ्या अर्थानं जड केलं.

तिथं हार्दिकनं गोलंदाजी करत विरोधी संघाला अतिरिक्त धावा दिल्या आणि इथं Live Telecast मध्ये भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी त्याच्यावर सडकून टीका केली.

‘गेल्या बऱ्याच काळापासून ही आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात वाईट गोलंदाजी होती. पहिला षटकार ठीक होता… समोरचा फलंदाज आता लेंथ बॉलचीच वाट बघतोय हे जाणूनही तुम्ही पुढचा चेंडूही लेंथ टाकता आणि तिसरा चेंडू फुलटॉस… तुम्हाला माहितीये की तो षटकारच मारणार तरीही… ‘, इनिंग्स ब्रेकमध्ये गावसकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ही अतिसामान्य कॅपट्न्सी आणि अतिसामान्य गोलंदाजी असल्याचं म्हणत चेन्नईच्या संघाला 185 ते 190 धावांपर्यंत रोखणं अपेक्षित होतं, जे होऊच शकलं नाही या शब्दांत हार्दिकवर टीका केली.

फक्त गावसकरच नव्हे, तर याच वेळी केविन पीटरसननंही हार्दिकच्या कर्णधारपदाविषयी सूचक वक्तव्य करत आता काहीतरी घडणं अपेक्षित आहे, कारण यामुळं त्याच्यावर (हार्दिकवर) आणि त्याच्या खेळावर परिणाम होत असल्याचं म्हणत कर्णधारपदाच्या या प्रवासातील चढ- उतारांवर आपलं ठाम मत मांडलं.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (15-04-2024)

Resume असा बनवा की कंपनीने फोन करून बोलावलं पाहिजे!

रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलसाठी भरती; असा करा अर्ज