इचलकरंजी–
कबनूर येथील व्यापाऱ्यावर जर्मनी गँगच्या तीन सदस्यांनी खंडणीसाठी (businessman)दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून इतर दोन आरोपींपैकी एक तुरुंगात असून दुसरा पोलिसांच्या ताब्यात आहे.फिर्यादी हुसैन बशीर मुजावर वय ४०, व्यवसाय – व्यापार, रा. दर्गा शेजारी, मुजावर गल्ली, कबनूर, ता. हातकणंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सायंकाळी कबनूर चौक येथे आरोपी करण वडर व मेहबुब उकली यांनी त्यांना धमकावत ५ लाख रुपयांची खुनाची सुपारी मिळाल्याचे सांगत खंडणीची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर करण वडर याने त्याच्या पँटच्या खिशातून जबरदस्तीने ७०० रुपये काढून घेतले आणि गुप्ती दाखवत “पैसे दे, नाहीतर काटा काढू” अशी धमकी दिली.

यानंतर ६ जुलै २०२५ रोजी आरोपी सचिन उर्फ शाम बाळासो घोरपडे याने फिर्यादीस फोन करून “शुभम पट्टणकुडेच्या जामिनासाठी ३०,००० रुपये दे” अशी खंडणी मागितली. (businessman)पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रिकुटाने वारंवार फिर्यादीकडून खंडणी मागितली असून त्याच्या व्यवसायात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी करण आण्णाप्पा वडर वय 30, रा. साठे नगर, कबनूर – फरार,मेहबुब इस्माईल उकली वय 24, रा. जवाहरनगर, इचलकरंजी – सध्या जेलमध्ये सचिन उर्फ शाम बाळासो घोरपडे वय 24, रा. मणेर हायस्कूल मागे, कबनूर – पोलिस ताब्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(businessman)गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत.
हेही वाचा :
शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!