इचलकरंजी (प्रतिनिधी) :
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदूर येथे शिक्षण घेणाऱ्या आणि शाहूनगर येथून रोज पायी शाळेत येणाऱ्या पाच विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणात सुसूत्रता आणि सोयीसाठी सायकल भेटस्वरूपात प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमामध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला. विशेषतः अविनाश कलगोंडा पाटील यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या सायकलीमुळे त्यांचा शाळेचा प्रवास आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे, असे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षण हा मूलभूत अधिकार असून, त्यात अडथळे येऊ नयेत यासाठी समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढे यावे, हा या उपक्रमामागचा सकारात्मक संदेश असून, पालक व ग्रामस्थांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शाळेच्या वतीने अविनाश कलगोंडा पाटील यांचे तसेच सर्व शिक्षक स्टाफचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
