इचलकरंजी, १६ मे : “संघर्ष करणाऱ्यांना यश हमखास मिळते. संयम आणि चिकाटी बाळगून सत्यासाठी लढा दिला पाहिजे,” असे प्रेरणादायी विचार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार(Journalists) संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी मांडले.

इचलकरंजीत पत्रकार(Journalists) राजू मेत्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेल्या राजू मेत्रे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने त्यांच्या निस्सीम संघर्षाचे आणि सत्यनिष्ठेचे कौतुक करत पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना कलढोणे म्हणाले, “शासनाला प्रसिद्धीसापेक्ष पत्रकारिता हवी असते, पण पत्रकारांनी सत्य मांडण्याचे धाडस दाखवले तर त्यांच्यावर अडथळे आणले जातात. तरीही पत्रकारांनी खंबीरपणे सत्य समोर आणत राहिले पाहिजे. न्याय उशिरा का होईना, मिळतोच.”
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे आयोजित बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः महिला पत्रकारांच्या(Journalists) अडचणी, पत्रकार संरक्षण कायदा, आणि डिजिटल मीडियातील आव्हाने यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात संघटनेचे संघटक सचिन बेलेकर यांचा “मास्टर कम्युनिकेशन इन जर्नलिझम” या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत संघटक सचिन बेलेकर यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष विजय तोडकर, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष सॅम (सलीम) संजापुरे यांनी केले.

या प्रसंगी संघटनेचे कोषाध्यक्ष रणधीर नवनाळे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती कलढोणे, उपाध्यक्षा अंजुम मुल्ला, सचिव संगीता हुग्गे, तसेच रसूल जमादार, मुबारक शेख, संतोष मोकाशी, अंकुश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ही बैठक डिजिटल पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली असून, आगामी राज्यस्तरीय मेळाव्याच्या तयारीला नवसंजीवनी मिळाली आहे. संघटनेची एकजूट व कार्यक्षमतेला यामुळे नवसंघटन लाभले आहे.
हेही वाचा :
शिवसेना-मनसे युतीला ब्रेक? मराठीजनांचे ‘ठाकरे पर्वा’चे स्वप्न अधुरेच
डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!
गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् धडाधडा झाडल्या गोळ्या; इन्फ्लुएंसरची निर्घृण हत्या; Video Viral