गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् धडाधडा झाडल्या गोळ्या; इन्फ्लुएंसरची निर्घृण हत्या; Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक भयाण आणि थरारक दृश्ये वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. यात एका मेक्सिकन इन्फ्लुएंसरला(Influencer) लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान गोळी मारून संपवल्याची घटना घडून आली. मुख्य म्हणजे, ही घटना यावेळी लाईव्ह कॅमेरात कैद झाली ज्यानंतर संपूर्ण जगभर याची चर्चा होऊ लागली आणि हवेच्या वेगाने घटनेचे व्हिडिओज शेअर करण्यात आले. व्हिडिओतील दृश्य फारच हादरवणारी असून हत्येचा संपूर्ण कट यात दिसून आला. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मध्य मेक्सिकन(Influencer) राज्यातील जलिस्को येथील एका ब्युटी सलूनमध्ये २३ वर्षीय व्हॅलेरिया मार्केझ टिकटॉक लाईव्हस्ट्रीम करत होती. याचवेळी अचानक एक डिलिव्हरी मॅन तिथे येतो. व्हिडिओत व्हॅलेरिया त्याच्याशी बोलताना दिसून येते मात्र तितक्यातच तिच्यावर एकामागून एक गोळ्या झाडण्यात येतात. तिच्या छातीत आणि डोक्यात बेछूट गोळ्या झाडल्या जातात. यानंतर ती खाली पडते आणि जागीच तिचा मृत्यू होतो. यावेळी ती लाइव्ह स्ट्रीमिंग करत असल्यामुळे हे सर्व दृश्य कॅमेरात कैद होते आणि हत्येचे हे सत्य जगासमोर येते.

मार्क्वेझच्या छातीत आणि डोक्यात गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की आरोपी मोटारसायकलवरून आला आणि तिला भेटवस्तू देण्याचे नाटक करत होता. मार्क्वेझचे इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर जवळपास २००,००० फॉलोअर्स होते आणि त्यांनी ब्युटी आणि लाइफस्टाईलचे व्हिडिओ शेअर करत असे.

तथापि पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोराबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मेक्सिको… लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये महिला हत्येचा दर सर्वाधिक आहे. पॅराग्वे, उरुग्वे आणि बोलिव्हियासह मेक्सिको यात चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा :

समांथा प्रभूचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट…

डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!

शिवसेना-मनसे युतीला ब्रेक? मराठीजनांचे ‘ठाकरे पर्वा’चे स्वप्न अधुरेच

‘गोविंदा एका मूर्ख बाईसाठी….’; गोविंदाच्या बायकोचा मोठा खुलासा