हातकणंगले/रुकडी (13 जून) – हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. सागरिका लॉजिंगमध्ये राहण्यास आलेल्या महिलेचा तिच्या प्रियकराने हातोडीने डोक्यात घाव घालून खून(murdered ) केला. मृत महिलेचे नाव सुमन सुरेश सरगर (वय 35, मूळ गाव जत, सांगली; सध्या राहणी उचगाव) असे आहे. पोलिसांनी आरोपी आदम गौस पठाण (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात सुमन सरगर व आदम पठाण यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, पठाण याने सुमनकडून सात लाख रुपये घेतले होते. ती सातत्याने त्या रकमेची मागणी करत होती. मात्र पैसे परत देणे शक्य नसल्यामुळे त्याने कट रचून तिचा खून (murdered )करण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी दोघे सागरिका लॉजमध्ये गेले असता, पठाण याने अचानक तिच्या डोक्यात हातोडीने जोरदार वार करत खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न करत सुसाईड नोट लिहून विष प्राशन केले. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
हातकणंगले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंके व हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच, अतिग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड, पोलिसपाटील रूपाली पाटील, आणि रुकडीचे माजी उपसरपंच शीतल खोत यांनी तपास कार्यात सहकार्य केले.
हेही वाचा :