कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
काही मतदार दूध संस्थांच्या वैधतेबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका,प्रशासक मंडळाची द्विधा भूमिका, मतदार संस्थांची प्रारूप यादी तयार करण्यास झालेला विलंब,संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी(political) केलेला गौप्यस्फोट असा एकूण गेल्या काही महिन्यांपासून “गोकुळ”च्या राजकारणाचा अक्षरशः दही काला झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात “गोकुळ”ही सहकारी तत्त्वावरील सर्वात मोठी व्यापारी संस्था मल्टी स्टेट करण्यासाठी मी या खात्याचा मंत्री असताना मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती पण केवळ शेतकऱ्यांच्या अर्थात दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य द्यायचे (political) म्हणून आपण ती ऑफर नाकारली असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी दोनच दिवसापूर्वी केल्यानंतर गोकुळच्या निवडणूक काळात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. महादेव जानकर यांचा रोख महादेवराव महाडिक गटाकडे आहे. कारण जवळपास 25 वर्षे गोकुळची सत्ता महाडिक गटाकडे होती.
गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट केला गेला असता तर त्याचा फायदा नेमका कुणाला झाला असता? दूध उत्पादकां चे हित डोळ्यासमोर ठेवून हा संघ मल्टीस्टेट करावयाचा होता का? आणि त्यासाठी 200 कोटी रुपये कोठून उपलब्ध केले जाणार होते? या प्रश्नांची उत्तरे गोकुळ संघाच्या संचालक मंडळाच्या या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळाली पाहिजेत. जानकर यांनी हा गौप्यस्फोट करण्यासाठी निवडणुकीचा मुहूर्त का निवडला? या आधी त्यांनी हे का सांगितले नाही? याची उत्तरे त्यांच्याकडून मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मुळातच एखादी सहकारी संस्था मल्टीस्टेट करण्याबद्दलचा एकतर्फी निर्णय घेण्याचा त्यांना ते मंत्री असताना होता का? अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागते आणि त्यांचाच निर्णय अंतिम असतो. मल्टी स्टेट चा विषय ज्यांच्या काळात विचारात घेण्यात आला होता त्यांनी यासंदर्भात खुलासा करण्याची गरज आहे आणि त्यांनी तो केला पाहिजे.
गोकुळ दूध संघाच्या होत असलेल्या निवडणुकीत यंदा प्रथमच राजकारण्यांचा थेट हस्तक्षेप झालेला आहे. इथल्या सत्ताकारणाची पक्षीय मांडणी प्रथमच होताना दिसते आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीत गोकुळ चा राजकीय दहीकाला झाला आहे.हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद हे गोकुळ चे अध्यक्ष असताना गोकुळची दुग्धजन्य उत्पादने इस्लामिक देशांमध्ये निर्यात केली जात होती आणि त्यासाठी या उत्पादनावर हलाल चे प्रमाणपत्र संबंधित देशांना द्यावे लागत होते. गोकुळची उत्पादने ही मुस्लिम देशांच्या नियमानुसार तसेच शरियत च्या अटीनुसार बनवली गेली आहेत असा या प्रमाणपत्राच्या माध्यमातून मुस्लिम देशांना विश्वास द्यावा लागत असे. हा प्रकार नवीद यांच्या कार्यकाळातच झाला असल्याची टीका तेव्हा केली जात होती. (political) तेव्हा सुद्धा खळबळ उडाली होती. पण आता हे प्रकरण मागे पडले आहे आणि महादेव जानकर यांनी या निवडणुकीत चर्चेसाठी संबंधितांना एक मोठा मुद्दा दिलेला आहे.
या निवडणुकीत काहीसे एकाकी पडलेले सतेज पाटील यांनी महादेव जानकर यांचा मुद्दा उचलून धरला असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. निवडणुकीचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट झाल्यानंतर हा मुद्दा वरच्या आवाजात उपस्थित केला जाऊ शकतो.मल्टी स्टेट चा मुद्दा गोकुळ सत्ताकारणाशी संबंधित असलेल्या मंडळींना नक्कीच माहीत असावा. पण त्यांनी तो उपस्थित न करता पर जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांनी तो अचानकपणे उपस्थित का करावा? त्यांचे “बोलाविते धनी’ कोणी वेगळे असावेत.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय