सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

जर तुम्ही सरकारी (government)शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) LT ग्रेड शिक्षकाच्या 7 हजार 466 पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केलीय.

Teacher Recruitment 2025 : जर तुम्ही सरकारी (government)शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) LT ग्रेड शिक्षकाच्या 7 हजार 466 पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 28 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार uppsc.up.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यावेळी आयोगाने भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता निवड दोन टप्प्यात केली जाईल, पहिली पूर्व परीक्षा (पूर्व) आणि नंतर मुख्य परीक्षा (मुख्य). LT ग्रेड शिक्षक भरतीमध्ये अशी परीक्षा प्रणाली पहिल्यांदाच लागू करण्यात आली आहे. यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि मजबूत होईल.

या भरतीअंतर्गत एकूण 7 हजार 466 पदे जाहीर करण्यात आली आहेत.

पुरुष श्रेणीसाठी: 4 हजार 860 पदे

महिला श्रेणीसाठी: 2 हजार 525 पदे

अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागासाठी: 81 पदे

पात्रता आणि वयोमर्यादा
ही नियुक्ती एकूण 15 विषयांमध्ये केली जाईल. आवश्यकता भासल्यास पदांची संख्या वाढवता किंवा कमी करता येईल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1985 पूर्वी आणि 1 जुलै 2004 नंतर झालेला नसावा. सरकारच्या नियमांनुसार राखीव श्रेणींना वयात सूट दिली जाईल.

यूपीपीएससीने या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी एक वेळ नोंदणी (ओटीआर) अनिवार्य केली आहे. ज्या उमेदवारांनी ओटीआर केले नाही ते अर्ज करू शकणार नाहीत. म्हणून, सर्वप्रथम, uppsc.up.nic.in वर जा आणि ओटीआर नोंदणी पूर्ण करा. दरम्यान, यावेळी आयोगाने भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता निवड दोन टप्प्यात केली जाईल, पहिली पूर्व परीक्षा होणार आहे. त्यानंतर या पदांसाठठी मुख्य परीक्षा देखील होणार आहे.

अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वर जा.
जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर OTR करा.
वेबसाइटवर दिसणाऱ्या LT ग्रेड शिक्षक भरती लिंकवर क्लिक करा.
तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाइन फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
एक प्रत प्रिंट करा आणि ती तुमच्याकडे सेव्ह करा.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार ३००० रुपये? जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन