लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी 1500 रुपये तारखेपूर्वी जमा होणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलैचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात आलेला नसताना, 15 ऑगस्टपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. मात्र ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेल्या अनेक महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. (women) त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेतील अर्जांची तपासणी सुरू असून, निर्धारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना लाभातून वगळले जात आहे. या प्रक्रियेसाठी आयकर विभागाचीही मदत घेतली जात आहे. सरकारने सुरुवातीपासूनच योजनेसाठी काही नियम व अटी निश्चित केल्या होत्या. मात्र त्यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केल्यानंतर अनेक अर्ज पात्र ठरवण्यात आले होते.

आता जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपूर्वी योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात जुलैचा निधी जमा होण्याची शक्यता आहे. (women) याबाबत अंतिम निर्णय उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो. लाडक्या बहिणींसाठी निधी थेट त्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याच्या प्रक्रियेला याच बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार निधी हस्तांतरित केला जात आहे. मात्र जुलैचा हप्ता 18 ऑगस्टपर्यंतही खात्यात जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना दिलासा देण्यासाठी दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जुलैच्या हप्त्याबाबत आता सरकारच्या निर्णयाकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

योजना अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या पडताळणीनंतर तब्बल 80 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महिलांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. (women) दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आता पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता असल्याने पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?