कर्मचारी भविष्य निधी खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि सुलभ करण्यात आली आहे. ऑनलाईन क्लेम दाखल केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत रक्कम खात्यात जमा होणार असून भविष्यात युपीआय द्वारेही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

देशातील लाखो नोकरदारांच्या पगारातून दरमहा पीएफची रक्कम जमा केली जाते. गरज भासल्यास कर्मचारी या खात्यातील पैसे काढतात. यापूर्वी क्लेम मंजूर होण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र गेल्या वर्षापासून कर्मचारी भविष्य निधी संघटनेने डिजिटल प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या आहेत. (Employees) त्यामुळे आता पीएफमधील पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे.
ईपीएफओचे वरिष्ठ अधिकारी रमेश कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील प्रलंबित कामांमध्ये मोठी घट झाली असून सध्या सुमारे 90 टक्के पीएफ क्लेम ऑटो-सेटलमेंटद्वारे पूर्ण केले जात आहेत. आजारपण, विवाह, घर खरेदी किंवा घर बांधकाम अशा गरजांसाठी कर्मचारी पीएफमधील रकमेचा वापर करतात. (Employees) आता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 48 तासांत क्लेम मंजूर करून संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे.
पीएफ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया आणखी वेगवान करण्यासाठी भीम ॲपचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. ईपीएफओ लवकरच भीम ॲपच्या माध्यमातून थेट बँक खात्यात रक्कम पाठवण्याची प्रणाली सुरू करणार आहे. युपीआयशी लिंक असलेल्या बँक खात्यात पीएफची रक्कम थेट जमा होईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील एका महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होण्याची शक्यता असून त्यामुळे क्लेम मंजुरीनंतर त्याच दिवशी पैसे खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, पीएफवरील व्याजदर वाढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली नाही. सध्या पीएफ ठेवींवर 8.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ईपीएफओने आतापर्यंत 34 कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात जवळपास 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज जमा केले असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (Employees) तसेच आगामी काळात एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?