सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! जुलैच्या पगारासोबत ‘हा’ आर्थिक लाभ मिळणार

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना(financial)लवकरच महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वित्त विभागाने प्रस्ताव पाठवला असून, लवकरच यास अधिकृत मंजुरी मिळेल, अशी माहिती आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, जो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. मार्च महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% केला होता. त्यानंतर विविध राज्यांनी हा निर्णय स्वीकारला असून, महाराष्ट्र सुद्धा त्याच दिशेने पावले टाकत आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. (financial)त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारासोबतच जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा DA फरक देखील मिळणार आहे. सरकारकडून यासंदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाण्याची शक्यता आहे.म्हणजेच जुलै महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता + मागील सहा महिन्यांचा फरक, अशा दुहेरी लाभाची अपेक्षा कर्मचारी आणि पेन्शनधारक करू शकतात. सरकारकडून यावर अंतिम मंजुरी मिळताच GR जारी केला जाईल आणि पुढील वेतनपत्रकात हे बदल लागू होतील.

या निर्णयाचा लाभ लाखो राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणार आहे. (financial)सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर DA वाढ ही मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. शिक्षण, पोलीस, महसूल, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांतील कर्मचारी या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. DA वाढीचा शासन निर्णय येताच जिल्हानिहाय आणि विभागवार वेतन हिशोब अद्ययावत करण्यात येईल. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना विनंती – आपल्या बँक खात्यांवर लक्ष ठेवा आणि पगारपत्रक येताच फरकाची रक्कम तपासा.

हेही वाचा :

“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral