गुड न्यूज! व्हॉट्सअ‍ॅपवर मल्टी-अकाउंट फीचरची एन्ट्री, कसं वापराल? पाहा एका क्लिकवर

व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट येणार आहे.(WhatsApp)आता iPhone वापरकर्ते लवकरच एकाच डिव्हाइसवर वैयक्तिक आणि व्यावसायिक WhatsApp खाती सहज वापरू शकणार आहेत. Meta मालकीच्या या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये iOS साठी मल्टी अकाउंट सपोर्ट फिचर विकसित करण्यात येत असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.नवीन फिचरअंतर्गत, WhatsApp अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये “Account List” नावाचा एक स्वतंत्र विभाग असेल. या विभागात सर्व साइन-इन केलेली WhatsApp खाती दाखवली जातील आणि वापरकर्ते एकाच टॅपमध्ये खाते बदलू शकतील लॉगआउट किंवा अ‍ॅप रीस्टार्ट करण्याची गरज भासणार नाही.

वेगवेगळी WhatsApp खाती एका iPhone वर वापरण्याची मुभाप्रत्येक खात्याचा स्वतंत्र चॅट हिस्टरी, मीडिया आणि सेटिंग्जसह सहज अ‍ॅक्सेसखाते स्विच केल्यावर लगेच त्या खात्याच्या सूचना, टोन, बॅकअप आणि डाउनलोड पर्याय सक्रिय होतील नवीन मेसेजची सूचना त्या-त्या खात्याच्या नावासह येईल, (WhatsApp)त्यामुळे कोणत्या अकाउंटसाठी मेसेज आला हे लगेच ओळखता येईल

नोटिफिकेशनवर टॅप केल्यावर थेट संबंधित खाते उघडेल आणि चॅट सुरू करता येईल हे फिचर विशेषतः व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी दोन वेगवेगळे WhatsApp अकाउंट वापरणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. (WhatsApp)यामुळे एकापेक्षा जास्त फोन घेण्याची गरज उरणार नाही आणि लॉगइन-लॉगआउट करण्याची वेळ देखील वाचणार आहे.

WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फिचर सध्या iOS वरील WhatsApp Beta वर्जन 25.19.10.74 मध्ये दिसले असून अद्याप Apple TestFlight बीटा वापरकर्त्यांनाही ते उपलब्ध झालेले नाही. कंपनीने अद्याप या फिचरच्या अधिकृत लॉन्च तारखेची घोषणा केलेली नाही.व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे आणि भन्नाट अपडेट iPhone वापरकर्त्यांना एकाच डिव्हाईसवर अनेक खात्यांचा सहज अनुभव देणार आहे. यामुळे व्यवसाय, खाजगी जीवन आणि संवाद यामध्ये स्पष्टपणा व सोयीचा अनुभव मिळणार आहे. आता फक्त या फिचरच्या अधिकृत रिलीजची प्रतीक्षा आहे

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..