‘एक्स’ आणि ‘ब्लॉक’ सारख्या कंपन्यांचे संस्थापक असणारे जॅक डोर्सी हे आहेत.(news) ते पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांनी एक असे हटके अॅप सादर केले आहे, जे इंटरनेट, मोबाईल नंबर आणि ईमेलशिवाय चॅटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या अॅपचे नाव ‘बिटचॅट’ आहे. हे अॅप एक डिसेंट्रलाइज्ड मेसेजिंग सिस्टम आहे, जे ब्लूटूथ लो एनर्जी तंत्रज्ञानावर काम करते.बिटचॅट हे एक मोबाइल मेसेजिंग अॅप आहे जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नसतानाही काम करते. ते peer-to-peer मेसेजिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की एक मोबाइल थेट दुसऱ्या मोबाइलशी कनेक्ट होतो आणि मेसेज पाठवतो. हे अॅप जॅक डोर्सीचा वीकेंड प्रोजेक्ट मानले जाते, परंतु त्याच्या तंत्रज्ञानाने आणि संकल्पनेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

बिटचॅट ब्लूटूथ मेश नेटवर्कद्वारे डिव्हाइस-टू-डिव्हाइस कनेक्शन तयार करते. हे नेटवर्क 300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर काम करते. (news)तर यामध्ये मेसेज मल्टी-हॉप सिस्टमद्वारे पाठवले जातात, म्हणजेच, जर दोन डिव्हाइसेस दूर असतील तर मधील बाकी मोबाइल डिव्हाइसद्वारे मेसेज फॉरवर्ड होतो. तसेच, युजर्सच्या डिव्हाइसवर मेसेज तात्पुरत्या मेमरीमध्ये संग्रहित केला जातो आणि जर रिसिव्हर ऑफलाइन असेल तर मेसेज नंतर डिलिव्हर होतो.फोन नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही : यामध्ये मोबाइल नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही, म्हणजेच हे पूर्णपणे खासगी आहे.सर्व्हर नाही अन् सेंट्रलाइस कंट्रोलही नाही : कोणताही केंद्रीय सर्व्हर नाही, म्हणून अॅप सेन्सरशिप-मुक्त आहे आणि नेटवर्क ब्लॉकिंगपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.
नॉर्मल मेसेज १२ तासांनंतर आपोआप डिलीट होतात.(news)तर आवडते मेसेजे अमर्यादित काळासाठी सेव केले राहू शकतात. जर मेसेज रिसिव्हर उपलब्ध नसेल तर अॅप मेसेजला संग्रहित करते आणि नंतर नेटवर्क मिळताच ते सेंडही केले जाते.यामध्ये, तुम्हाला चॅट रूम फिचर मिळेल. डिस्कॉर्ड प्रमाणे, एक विषय-आधारित चॅट रूम आहे. तुम्ही त्यात कोणत्याही युजर्सला मेंन्शन करू शकाल. याशिवाय, कोणत्याही खासगी चॅटसाठी पासवर्ड सेफ्टी रूम, नेटवर्कशिवाय मेसेज पाठवण्याचा पर्याय आहे आणि ते वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अकाउंटची किंवा आयडीची आवश्यकता नाही.
सध्या, हे अॅप Apple TestFlight द्वारे iOS वापरकर्त्यांसाठी बीटा व्हर्जनमध्ये लाँच केले गेले आहे. बीटा अॅक्सेसनंतर, ते येत्या काळात अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील आणले जाऊ शकते.हे अॅप आपत्कालीन परिस्थितीत नेटवर्क नसले तरीही मेसेज पाठवणे सोपे करेल. आपत्ती क्षेत्रं, निषेध किंवा वैयक्तिक संभाषणांसाठी ते खूप चांगले सिद्ध होऊ शकते. ते WhatsApp आणि Telegram सारख्या प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक खासगी असू शकते.
हेही वाचा :
“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव
कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral
रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral