आनंदाची बातमी! या सरकारी योजनेत विद्यार्थ्यांना मिळते मोफत स्कूटी

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(scooty) यातील काही योजनांमध्ये शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. दरम्यान, आता १२ वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे. अशी योजना राजस्थान सरकारने सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. जेणेकरुन विद्यार्थी अभ्यास करतील.राजस्थानमधील या योजनेचं नाव कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना असं आहे. या योजनेत जर १२वीत चांगले गुण मिळाले तर सरकारकडून मोफत स्कूटी दिली जाईल.

विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, (scooty) या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. आई वडिलांनी मुलींना नियमित शाळेत पाठवावे, त्यांना कॉलेज जाण्यासाठी सवलत मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशातून ही योजना सुरु केली आहे.याचसोबत स्कूटीमुळे मिळणाऱ्या सुविधा, ही स्कूटी विद्यार्थ्यांच्या नावावर असते. या योजनेत स्कूटीचा ५ वर्षांचा इन्श्युरन्स मिळतो. एक वर्षाचा फुल इन्श्युरन्स आणि ५ वर्शांचा थर्ड पार्टी इन्श्युरन्स मिळतो.तसेच २ लिटर पेट्रोल आणि एक हेलमेट दिले जाते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ही स्कूटी मिळेल ते लोक ५ वर्षांसाठी ही स्कूटी विकू शकत नाही.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी RBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ६५ टक्के गुण मिळवले आहे. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी७५ टक्के मिळवणे गरजेचे आहे. (scooty) विद्यार्थी राजस्थानमधील शाळेतून पास असणे गरजेचे आहे. कॉलेज किंवा ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन घेतले असावे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्तम २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा?
तुम्हाला सर्वात आधी https://hte.rajasthan.gov,in/ या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर SSO ID वरुन लॉग इन करायचे आहे. यानंतर जन आधारमधून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर ऑनलाइन स्कॉलरशिपवर क्लिक करा आणि काही आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

हेही वाचा :

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधूनही घेतली निवृत्ती?

क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज