बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, खाण्याचेही होते वांदे; कॉमेडी किंग भारती सिंगचा इंडस्ट्रीतील खडतस प्रवास, एकदा वाचाच

छोट्या पडद्यावरची ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवणाऱ्या(who) भारती सिंहचा आज (३ जुलै) वाढदिवस आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये लहानाची मोठी झालेली भारती आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, खाण्याचेही होते वांदे; कॉमेडी किंग भारती सिंगचा इंडस्ट्रीतील खडतस प्रवास, एकदा वाचाच

छोट्या पडद्यावरची ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवणाऱ्या भारती सिंहचा आज (३ जुलै) वाढदिवस आहे.(who) पंजाबमधल्या अमृतसरमध्ये लहानाची मोठी झालेली भारती आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीवर नावाजलेल्या ‘लल्ली’ या पात्राने भारती देशभरात प्रसिद्ध झाली. स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच तिने अनेक रिॲलिटी शो देखील होस्ट केले आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत, ती अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी स्पर्धा करते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३’द्वारे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या भारती सिंहचे आयुष्य खूप खडतर होते. पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या भारतीचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ- उतारांनी भरलेले होते. वडील गेल्यानंतर आईने मोठ्या कष्टाने तिला शिकवले.

‘लाफ्टर क्वीन’म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या भारती सिंहचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.(who) खुद्द भारती सिंहने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितले होते. एका मुलाखतीत भारतीने सांगितले होते की, “तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. मी जेमतेम दोन वर्षांचीच असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. तीन भावंडांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे मला गरिबीमुळे लहानपणापासूनच नोकरी करावी लागली होती. वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवून, त्यातून येणाऱ्या पैशांतून आम्हा तिनही भावांचाही आणि आपला उदारनिर्वाह केला. माझ्यासारखं बालपण कोणालाही मिळू नये, असं मी स्वतः कायम म्हणते. ”

“तू आज असतीस तर…”, क्षिती जोगने शेअर केली आजीसाठी खास पोस्ट; म्हणाली…

मुलाखतीदरम्यान भारतीने सांगितले की, “माझी आई लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवायची. तेव्हा मी सुद्धा कधी- कधी आईसोबत जायची. आई जेवण बनवायची आणि मी तिच्या बाजूलाच तिथेच बसायची. त्यावेळी स्वयंपाकघर आणि त्यात ठेवलेल्या वस्तू बघून आपलं घर असं कधी असेल का, असा प्रश्न तिला पडायचा. आईने मला आणि माझ्या भावंडांना कष्ट करायला शिकवले होते. त्यामुळे मी आणि माझे भाऊ आज स्वत: च्या मेहनतीने आणि समर्पणाने कुठवर पोहोचले आहेत. मला माझ्या आईने एक गोष्ट सांगितलीये. ती म्हणजे, ‘कठोर परिश्रम करणं कधीही सोडू नका. त्यामुळे मी आणि माझे भावंडांनी आईची आज्ञा पाळली आणि तसेच वागलो.’ ”

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार प्रिमियर, नाट्यप्रेमींकडून कौतुक

एका जुन्या मुलाखतीत भारती सिंहने सांगितलं होतं की, “माझी एका रिॲलिटी शोमध्ये निवड झाली होती आणि मी मुंबईत येण्याच्या तयारीत होते. मात्र, तिथे नातेवाईकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला होता. ते म्हणायचे की, यांना वडील नाहीत आणि हे असली कामं काय करतात?” बालपणापासून भारतीला प्रचंड उपेक्षा सहन करावी लागली होती. मात्र, आपल्या मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर तिने आज मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ