रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल हिसकवायला गेला प्रवाशांनी हात पकडून पुढच्या स्टेशनपर्यंत लटकवत नेला?

धावत्या रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला प्रवाशांनी पकडून ट्रेनच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत पुढील स्थानकापर्यंत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसी ते खगडिया या प्रवासादरम्यान घडलेली ही घटना सध्या प्रशासन आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

बिहारमधील बरौनी–कटिहार रेल्वेमार्गावरील मानसी स्थानकावर एका तरुणाने जनहित एक्स्प्रेसच्या खिडकीतून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, (running train) त्याचा हा प्रयत्न त्यालाच महागात पडला. मोबाईल खेचण्याचा प्रयत्न होताच डब्यातील प्रवासी सतर्क झाले आणि त्यांनी त्या तरुणाला पकडले.डब्यातील अनेक प्रवाशांनी खिडकीतून त्याचा एक हात घट्ट पकडून ठेवला. तो स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र प्रवाशांनी त्याची पकड सोडली नाही. परिणामी, मानसी स्थानकापासून खगडिया स्थानकापर्यंत तो ट्रेनच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेतच प्रवास करत राहिला.

या दरम्यान त्याच्या काही साथीदारांनी त्याची सुटका करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. (running train) ट्रेनच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेतील त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.खगडिया जीआरपीचे ठाणेप्रमुख मोहम्मद अलाउद्दीन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण हा भागलपूर जिल्ह्यातील नौगछिया येथील रहिवासी आहे.मानसी स्थानकावर त्याने जनहित एक्स्प्रेसच्या खिडकीतून एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. (running train) त्याच वेळी प्रवाशांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.ठाणेप्रमुखांनी सांगितले की, आरोपी मोहम्मद फखरुद्दीन उर्फ छोटू याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?