कोल्हापूर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने(dam) हजेरी लावली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत, तसेच वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे विसर्ग सुरु होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून 2465 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेले असून, लघू आणि मध्यम धरणे(dam) भरली गेली आहेत. अलमट्टी धरणामध्ये 90% साठा झालेला असून, 54 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोयना धरणामध्येही 90% साठा झाला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे, ज्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा:
एअरटेल ग्राहकांना मोठा दिलासा; कंपनीने सुरू केली फ्री रिचार्जची सुविधा
इचलकरंजी न्याय संकुलाला मंत्रिमंडळ बैठकीतून मंजुरी, वकील समूहात आनंदाचे वातावरण
राज्यातील यंत्रमागधारकांना विज बिलातील सवलतीसाठी प्रतिक्षा: वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यादेशाची प्रतीक्षा