राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?

बैलपोळापासून राज्यात(state) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज 9 सप्टेंबररोजी देखील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल.

हवामान विभागाने आज कोकणातील, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात(state) तर पालघर, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तसेच नाशिक व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुण्यात आणि साताऱ्यात आज घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे.

पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे कुठे ऊन तर कुठे पाऊस असं वातावरण सध्या दिसून येत आहे. आज विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याना यलो अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा:

इतिहासकार फडणवीस आणि जयंत पाटील

भाजपला धक्का; ‘हा’ नेता लवकरच करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

‘या’ राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; नव्या नोकरीसह होणार धनलाभ