राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले. पुरस्कार(Awards) सोहळ्यात काजोलने मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले.पुरस्कार सोहळ्यात काजोलने मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ (Awards)सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक मोठ्या कलाकारांना येथे सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड मनोरंजनसृष्टी गाजवलेल्या काजोलला चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024’ प्रदान करण्यात आला आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.
काजोल पुरस्कार सोहळ्याला आपल्या आईची साडी नेसून आली होती. तसेच काजोलची आई देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. काजोलने पुरस्कार घेतल्यानंतर मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. काजोल नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.
काजोल म्हणाली की, “नमस्कार सगळ्यांना… आज माझा वाढदिवस आहे.
वाढदिवसाला मी येथे या मंचावर इतक्या मोठ्या लोकांबरोबर उभी आहे. माझे भाषण आधीच झालं आहे. अनुपमजींनी जे माझ्यासाठी इतके चांगले भाषण केल्या त्यानंतर मी काय बोलू… पण मी इतकं बोलेन की, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे… कारण आज माझी आई येथे बसली आहे. मी आज तिची साडी नेसली आहे. हा पुरस्कार माझ्याआधी तिला मिळाला होता. त्यामुळे माझ्या वाढदिवसादिवशी इतकं मोठं गिफ्ट असूच शकत नाही.”
‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना ‘स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही गौरवण्यात आले.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?