इचलकरंजी:
शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत (attacks)असून मनपा प्रशासनाने यावर अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिनांक ३० मे रोजी ‘इचलकरंजी नागरिक मंच’च्या वतीने या समस्येविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य अधिकारी व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांना हलगर्जीपणाबद्दल नोटीसही बजावण्यात आली होती.मात्र, त्यानंतर दोन महिने उलटूनही परिस्थितीत फारसा फरक दिसून आलेला नाही. पालिकेच्या माहितीनुसार, या कालावधीत फक्त ९८४ भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली असून रोज सरासरी १५ ते १६ कुत्र्यांवरच ही प्रक्रिया राबवली जात आहे.

दरम्यान, चिकन सिक्स्टी फाईव्ह विक्री करणाऱ्या अनधिकृत गाड्यांवर कारवाईची भूमिका ‘लांडगा आला रे आला’ याप्रमाणे फोल ठरली आहे. सदर विषय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेऊन(attacks) थंड करण्यात आल्याचा आरोपही मंचने केला आहे. नविन झोन बाबत झालेल्या निर्णयामागे कोणाचा राजकीय दबाव होता, यामागील गौडबंगाल उघड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याशिवाय आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याने कारभार ढिसाळ झाला असल्याची टीका मंचने केली आहे. कुत्र्यांची नसबंदी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, (attacks)अन्यथा भविष्यात कुत्र्यांमुळे काही अनुचित घटना घडल्यास त्यास संपूर्णपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचने दिला आहे.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?