महादेवीला पुन्हा नांदणी मठाच्या स्वाधीन करावे, यासाठी सर्व पक्ष(support)आणि सर्व धर्मीयांतर्फे आंदोलने होत आहेत. नांदणी-कोल्हापूर पदयात्रेने शासनाला जाग आणली. मुंबईतील बैठकीत सरकार आणि मठातर्फे फेरविचार याचिका दाखल करण्याचे ठरले; मात्र या कायदेशीर प्रक्रियेत महादेवीची घरवापसी काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत.हत्ती अनुसूचित – एक म्हणजेच डोंगरी व कॅप्टीव्ह एलिफंट पाळीव हत्ती या दोन प्रकारांत मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य सरकारने विशेष कायदा करणे आवश्यक आहे. तरच अशा अपवादात्मक प्रसंगात धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नांदणी मठात महादेवी परत येणार नाही, तोपर्यंत रिलायन्स उद्योग समूहाच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये सुरू करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.महादेवी माधुरी हत्तीणप्रश्नी नांदणी मठ आणि राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली जाईल. महादेवीला परत आणण्यासाठी शासन सकारात्मक असून, मठाच्या धार्मिक परंपरा जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नांदणी ता. शिरोळ येथील जिव्हाळ्याच्या बनलेल्या महादेवी हत्तीणप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील खासदार, आमदार यांच्यासह स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक बोलावली. त्यात फडणवीस म्हणाले, ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. महादेवी हत्तीण ३४ वर्षांपासून नांदणी मठात असून, ती परत आली पाहिजे,(support) ही आपल्या सर्वांची इच्छा आहे.’’
ते म्हणाले, ‘‘हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक पथक तयार करेल. तसे सर्वोच्च न्यायालयात सांगेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतही राज्य सरकार आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयास आश्र्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल. ‘महादेवी’प्रश्नी जनभावना लक्षात घेऊन तिला परत नांदणी मठात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सरकारमार्फत केले जातील.’’

नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, ‘‘महादेवी आणि नांदणी मठाचे नाते भावनिक आहे. ‘महादेवी’ला मठाच्या स्वाधीन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.’’ राजू शेट्टी म्हणाले, ‘‘पेटा’ने आर्थिक आमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे. अशा वनतारामधील हत्तींची सध्या काय स्थिती आहे, याची कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती २०२३ मध्ये वनतारा येथे नेण्यात आला. आज तो हत्ती तिथे आहे की नाही, याबाबत आम्हाला संशय आहे. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जवळपास चार-पाच पाळीव हत्ती मृत झाल्याचे सांगितले. राज्य सरकारने याची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वनविभागास दिले आहेत.’’
शेट्टी यांनी आरोप केला, की पेटा व वनताराकडून हत्ती घेऊन जाण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. नांदणी मठात ‘महादेवी’ची ११ वेळा वैद्यकीय तपासणी केली. त्याचे सर्व अहवाल सकारात्मक आहेत. आता राज्यासह कर्नाटकातील काही मठांना त्यांचे हत्ती घेऊन जाण्याबाबत नोटिसा देण्यात येत आहेत. चांगल्या पध्दतीने देखभाल करूनही अशा कृत्यांद्वारे समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या जात आहेत.’’बैठकीत विविध लोकप्रतिनिधींनी महादेवीच्या घरवापसीची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने,(support)आमदार सर्वश्री सतेज पाटील, अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ललित गांधी, अपर मुख्य सचिव वन, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सदाभाऊ खोत, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, अप्पासाहेब भगाटे, सागर पाटील, अॅड. मनोज पाटील, विजय माणगावे, राजवर्धन नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.
महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यासाठी पथक नांदणीत दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाकडून दगडफेकीचे प्रकार झाले होते. या संदर्भातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राहुल आवाडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गुन्हे मागे घेण्याची ग्वाही दिली.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?