ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षरा अर्थात (health)हिना खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या हेल्थमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. सध्या ती त्यावर उपचार घेत आहे. अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. आता अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये डोक्यावरील केस काढतानाचा व्हिडिओ शेअर केला.
हिना खानला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. निदान होताच अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. किमोथेरेपी दरम्यान होणाऱ्या साईड इफेक्ट्समुळे तिने डोक्यावरील केस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अभिनेत्री स्वत:ला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्यावर किमोथेरेपी झाली होती. या दरम्यान, अभिनेत्रीने डोक्यावरील केस कापले होते. आता त्यानंतर तिने स्वत: डोक्यावरील केस काढताना दिसत आहे.हिना खानने इन्स्टाग्रामवर केस (health)कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिना ट्रीमरने केस काढताना दिसत आहे. ट्रीटमेंट सुरू असताना केस हातात येत असल्याचे तिने दाखवले. केस हातात येत असल्यामुळेच तिने टक्कल केल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या भावना व्यक्त करताना दिसते. भावना व्यक्त करतानाचा व्हिडिओ तिने इन्स्टावर स्वत: शेअर केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.
डोक्यावरील केस कापताना अभिनेत्री (health)इमोशनल झाली होती. व्हिडिओवर अनेक युजर्सने तिला चॅम्पियन अशी कमेंट केली आहे. व्हिडिओवर सेलिब्रिटी आणि फॅन्स कमेंट करत तिला लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे
खुशखबर! आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म फक्त ५ मिनिटातच भरता येणार
पाचशे, हजार रुपयांत नव्हे तर अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’