समाजातील लोकांचा सफाई कर्मचाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन(people) नेहमीच संशयास्पद असतो. परंतु, या कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच आजही सामान्य माणूस सुरक्षित आहे.

कर्जत तालुक्यात रिसॉर्ट आणि फॉर्म हाऊसेस यांची साखळी निर्माण झाली आहे.(people) त्यातील कशेळे येथे असलेल्या उत्कर्षा रिसॉर्ट मध्ये हरवलेली सोन्याची अंगठी तेथील तरण तलावाच्या पाण्यात सफाई कर्मचाऱ्याला आढळून आली.दरम्यान,नवी मुंबई येथील पर्यटकाची हरवलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी परत केल्याने त्या कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील उत्कर्षां रिसॉर्ट येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या विकेंड रोजी नवी मुंबई येथील ४० पर्यटकांचा गट उत्कर्ष रिसॉर्ट मध्ये पर्यटन(people) आणि वर्षसहली साठी आला होता.त्या ग्रुप मधील तरुण तरुणी यांनी दोन दिवस धमाल केली. रविवार सायंकाळी ही पर्यटक आपल्या घरी परतले.त्यावेळी त्यातील पर्यटक बिपिन गावंड यांच्या हातातील बोटात असलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या ग्रुपने रिसॉर्ट मधील सर्व भागात धमाल केली होती.त्यात मौज मस्ती केली कॅरम, टेबलटेनीस, क्रिकेट, रेनजीडान्स, स्विमिंग पूल येथे मौज मस्ती केली. त्यामुळे बिपीन गावंड यांना आपली अंगठी कुठे हरवली आहे किंवा पडली आहे हे ठामपणे सांगता येत नव्हते . गावंड यांनी ही बाब उत्कर्ष रिसॉर्टचे संचालक उदय पाटील यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर रिसॉर्टचे संचालक राज पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अंगठी शोधण्यास सांगितले. त्या सोन्याचे अंगठीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण अंगठी काही आढळून आली नाही.दुसऱ्या दिवशी उत्कर्षां रिसॉर्ट मधील कामगार जे स्विमिंग पूल स्वच्छ करायला गेले असता त्यातील सफाई कामगार राजू प्रजापती हा स्वच्छता करीत असताना त्यांना फिल्टरच्या जाळी मध्ये अडकून पडलेली सोन्याची अंगठी सापडली.
ही अंगठी प्रजापती या कामगाराने रिसॉर्ट मालक उदय पाटील यांचेकडे आणून दिली. रिसॉर्ट चे संचालक राज पाटील यांनी बिपीन गावंड यांना संपर्क करून अंगठी सापडली असल्याचे कळविले.त्यानंतर बिपीन गावंड आणि अन्य काही मित्र नवी मुंबई येथून पुन्हा कर्जत तालुक्यातील कशेळे येथे आले.उत्कर्ष रिसॉर्ट मध्ये पोहचून अंगठी ताब्यात घेतली आणि रिसॉर्ट मालकाचे तसेच कामगाराचे आभार मानले.कर्जत तालुक्यात पाच हजार हून अधिक स्थानिक तरुणांचे रिपोर्ट आणि कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत.त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय फुलविला असून या ठिकाणी विकेंड रोजी हजारो पर्यटक येत असतात आणि व्यापार उद्यम वाढविण्यात हातभार लावत आहेत.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ