कामाच्या आधीच दिले पैसे यास व्यवस्थापन म्हणावे कैसे

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : आधी काम आणि मग दाम किंवा दाम करी काम असे म्हटले जाते. त्यातील उपवासाचा, उपरोधाचा भाग सोडला तर काम केल्याशिवाय पैसे(money) दिले जात नाहीत. शासकीय, निमशासकीय कार्यालयात तर केलेल्या कामाचे पैसे मागताना संबंधितांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे पैशासाठी पैसा पेरावा लागतो. एकूणच पैशाची देवाण-घेवाण हा अतिशय महत्त्वाचा व्यवहार समजला जातो. हा व्यवहार कधीकधी मजेशीर असतो तर कधी कधी आश्चर्यचकित करणार असतो. कोल्हापूर महापालिकेत एका कंत्राटदाराला काम व्हायच्या आधीच तब्बल 85 लाख रुपये अदा करण्यात आल्याचा सामान्य जनतेला विस्मय चकित करून सोडणारा प्रकार घडला.

टेंडर किंवा निविदा प्रक्रिया राबवून कामे करून घेतली गेली आहेत पण काम पूर्ण करूनही पैसे दिले जात नाहीत म्हणून राज्यातील कंत्राटदारांनी दोन महिन्यापूर्वी शासनाविरुद्ध मुंबईत मोर्चा काढला होता. शासनाने हजारो कोटी रुपये थकवले आहेत. कंत्राटदारांनी चालू असलेली कामे सुद्धा निषेध म्हणून बंद ठेवली होती. कोल्हापूर महापालिकेत मात्र उलटे आणि भलतेच घडले आहे. श्री प्रसाद वराळे या कंत्राटदाराला कसबा बावडा परिसरातील ड्रेनेजचे काम देण्यात आले होते पण काम व्हायच्या आधीच त्याला संपूर्ण रक्कम म्हणजे 85 लाख रुपये देण्यात आले आहेत.

कंत्राट दाराला त्यांनी पूर्ण केलेल्या कामाचे पैसे(money) द्यावयाचे असतील तर त्याबद्दलच्या फाईल चा प्रवास या टेबलावरून त्या टेबलाकडे आणि या विभागाकडून त्या विभागाकडे असा सुरू असतो. श्री प्रसाद वराळे याला 85 लाख रुपये देण्याच्या फाईलवर अनेकांच्या सह्या आहेत, त्यापैकी एकालाही काम झाले आहे काय किंवा कसे झाले आहे याची चौकशी करण्याची इच्छा झाली नाही.

शहानिशा न करताच प्रत्येकाने फाईलवर सह्या केल्या. सर्वसामान्य माणसाच्या रीतसर कामाची निर्गत करताना अनेक उनिवा काढल्या जातात. त्याची फाईल पुढे जात नाही. आता हे श्री प्रसाद वराळे प्रकरण उघडकीस आल्यावर तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता उद्या गायकवाड यांच्यावर आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसा बजावलेल्या आहेत.

वास्तविक काम न करता संबंधिताला 85 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीतून देण्यात आले आहेत हे स्पष्टपणे समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या विरुद्ध महापालिकेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पाहिजे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या एकूण प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा जे कोणी जबाबदार आहेत त्यांची नावे पुढे येतील. आणि तशी नावे पुढे आल्यानंतर त्यांनाही या गुन्ह्यात सह आरोपी केले गेले पाहिजे.

या महापालिकेत”आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय”असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत आणि संबंधितांच्या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंद झालेले आहेत. बांधकाम परवाना विभागातील शिरदवाडे घोटाळा हा तर काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. या प्रकरणात शहर अभियंत्यांना तसेच इतर काही जणांना अटकही करण्यात आलेली होती आणि हे प्रकरण सध्या न्याय प्रलंबित आहे.

परिवहन उपक्रमाच्या सुभाष रोड येथील यंत्र शाळेत डिझेल घोटाळा झाला होता. शहरात रस्त्यावर बसून मालाची विक्री करणाऱ्यांच्या कडून दररोज शुल्क आकारले जाते. त्याला “रमा फी”म्हटले जाते. इथेही लक्षावधी रुपयांचा घोटाळा यापूर्वी झाला होता. अशा प्रकारचे घोटाळे केवळ कोल्हापूर महापालिकेत घडलेले आहेत असे नाही. इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असे प्रकार घडलेले आहेत. जिल्हा परिषदेमधील करोडो रुपयांची (money)रक्कम सायबर गुन्हेगारांनी हॅक केली होती. अर्थात वेळीच बँक खाते गोठवण्यात आल्यामुळे हे पैसे सायबर गुन्हेगारांच्या खात्यावर जमा झाले नाहीत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः उद्धव ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही भ्रष्टाचार चे प्रकरणे बाहेर काढली होती. पण महायुतीच्या नेत्यांनी विशेषता एकदाच शिंदे यांच्या शिवसेनेने मिठी नदी गाळ उपसा प्रकरण बाहेर काढले होते. दिग्गो मारिया या अभिनेत्याला मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याचे सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. पण काम पूर्ण न करताच त्याला मुंबई महापालिकेच्या वतीने पैसे अदा करण्यात आले होते.

मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर दिगो मारियाला तो अभिनेता असतानाही काम कसे काय दिले असा सवाल विचारण्यात आला होता. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराबद्दल नेहमीच टीका केली जाते. तेथील प्रशासनाला सर्वसामान्य जनतेकडून धारेवर धरले जाते पण व्यवस्थेच्या प्रमुखांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे आजचे वास्तव आहे.

हेही वाचा :

दुखापतग्रस्त पंतच्या जागी दुसरा खेळाडू फलंदाजी करणार? जाणून घ्या ICC चा नियम

खळबळजनक घटना! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकले

कर्तव्य विसरला, पोलीस अधिकाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार आणि…