कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
दीपावली सणाच्या तोंडावर काँग्रेसने नवी दिल्लीत दिनांक एक नोव्हेंबर रोजी महा रॅलीचे आयोजन केले आहे.(organized) तेथील व्यापारी संघटनेने ही रॅली दीपावली सण झाल्यानंतर काढावी असे आवाहन केले आहे. कारण या रॅलीमुळे सुमारे 25 हजार कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल धोक्यात येऊ शकते. पण व्यापाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता ही रॅली काढण्याचे व रामलीला मैदानावर सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. या रॅलीच्या निमित्ताने काही लाख लोकांना भारताच्या राजधानीत आणण्याची, जमावण्याची पूर्वतयारी चालू आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हटाव या मागणीसाठी ही रॅली असल्याचे सांगण्यात येत असले तरी उघडपणे चर्चा सुरू आहे रेजीम चेंज ची! तथापि भारत आणि फ्रांस मध्ये खूप अंतर आहे हे इथे समजून घेतलं पाहिजे.

गेल्या दोन महिन्यांपासून नवी दिल्लीतील जंतर मंतर तसेच कॅनॉट प्लेस येथे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे नवी दिल्लीतील व्यापाऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणि म्हणूनच पुन्हा दिनांक एक नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत महा रॅली काढण्यात आली तर परिस्थिती बिघडू शकते आणि परिणामी ऐन सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. (organized) आणि म्हणूनच आंदोलनाचा धसका घेतलेल्या व्यापाऱ्यांनी काँग्रेसला दीपावली सण झाल्यानंतर रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. पण अद्याप तरी काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभा घेण्याला तसेच रॅली काढण्याला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. रामलीला मैदानावर किमान दहा लाख लोकांनी यावे अशा पद्धतीने नियोजन सुरू आहे. तथापि इतक्या प्रचंड संख्येने लोकांना एकाच विषयावर एकत्र आणायचे झाले तर त्याला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असावा लागतो आणि सर्वसामान्य जनता नवी दिल्ली किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या आणि झालेल्या आंदोलनापासून दूर होती आणि आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षित जन समर्थन मिळणे अशक्य आहे. इतकी गर्दी जमवणे शक्य नाही. काम यापूर्वी जयप्रकाश नारायण तसेच नंतर चौधरी चरण सिंग यांनी नवी दिल्लीत रॅली काढली होती आणि त्या रॅलीत लाखभर लोक सहभागी झाले होते.
या रॅलीच्या संदर्भात देशभर आणि देशाबाहेरही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. जंतर-मंतर रोडवर आणि नंतर फ्रान्स मध्ये झालेल्या आंदोलनात काही साम्य स्थळे आहेत आणि होती. फ्रान्स, इटली, अलबेनिया वगैरे 10 /11 देशांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रेड अँड ग्रीन इकोसिस्टीम सक्रिय आहे. कट्टर वामपंथी आणि इस्लामिक विचारधारा असलेल्या 100 पेक्षा अधिक संघटना या आंदोलनामध्ये आहेत. त्यांना अराजकता किंवा सत्ता बदल घडवून आणावयाचा आहे. हा एक महाभयंकर आंतरराष्ट्रीय कट आहे. भारतामध्ये अशाच प्रकारची अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची, सत्ता उलथावून टाकायची, असे हेतू या संघटनांचे आहेत. कदाचित राहुल गांधी किंवा त्यांच्या इंडिया आघाडीला या गटकारस्थानाला बळी पडावयाचे नसेलही पण या आंतरराष्ट्रीय संघटनांना सहाय्यभूत होईल (organized) अशी भूमिका काँग्रेस आणि इंडिया आघाडी कडून घेतली जात आहे.
दिनांक एक नोव्हेंबर रोजी च्या इंडिया आघाडीच्या महा रॅलीला आणि रामलीला मैदानावरील सभेला कशा पद्धतीने सामोरे जायचे याची रणनीती केंद्र शासनाकडून आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली पोलीस मुख्यालयात जाऊन पोलिस आयुक्तांशी चर्चा केलेली दिसते. फ्रान्स, इटली, स्पेन वगैरे देशांची संस्कृती वेगळी आहे. भारताची संस्कृती वेगळी आहे. या राष्ट्रातील समस्या वेगळ्या आहेत. भारतातील समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे फ्रान्स आणि इटली मध्ये जे घडले आहे घडत आहे ते भारतामध्ये घडण्याची सुतराम शक्यता नाही. कारण भारतापासून फ्रान्स खूप दूर आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अॅटम बॉम्ब मोठी खळबळ