भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या फक्त त्याच्या खेळामुळे नव्हे,(bowler)तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. हसीन जहाँसोबतच्या दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईत आता कोर्टाचा अंतिम निकाल लागला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला दरमहा पोटगी स्वरूपात 4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. यात 1.5 लाख रुपये पत्नी हसीनसाठी आणि 2.5 लाख रुपये मुलगी आयरासाठी असतील.

हा निर्णय शमीसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, गेल्या सात वर्षांचा एकत्रित खर्च देखील शमीला भरावा लागणार आहे. याचा हिशेब केल्यास त्याला एकूण 3 कोटी 36 लाख रुपयांची रक्कम पत्नी आणि मुलीसाठी भरावी लागणार आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल आहे.
2025 पर्यंत मोहम्मद शमीची एकूण संपत्ती 55 ते 65 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्याच्या कमाईचे मुख्य स्त्रोत म्हणजे BCCI करार, आंतरराष्ट्रीय सामने, IPL आणि विविध ब्रँड्सची जाहिरात. (bowler)शमी सध्या BCCI च्या ग्रेड A करारात असून त्यातून त्याला वार्षिक 5 कोटी रुपये रिटेनर फी मिळते. त्याशिवाय टेस्ट, वनडे आणि T20 सामन्यांसाठी प्रत्येकी वेगळे मानधन मिळते.IPL मधूनही शमी मोठी कमाई करतो. 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 10 कोटी रुपयांना खरेदी केले. IPL कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. त्यामुळे तो लीगमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

मोहम्मद शमी Nike, CEAT, Puma, SS, OctaFX, Vision 11 यांसारख्या नामवंत ब्रँड्ससाठी जाहिराती करतो. रिपोर्टनुसार, तो एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी रुपये मानधन घेतो. हे जाहिरात करार त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नात महत्त्वाची भर घालतात. त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न 4 ते 5 कोटींपर्यंत पोहोचतं.(bowler)शमीच्या संपत्तीच्या तुलनेत दरमहा 4 लाख रुपयांची पोटगी ही त्याच्यासाठी फार मोठी आर्थिक अडचण ठरणार नसली तरी, मागील सात वर्षांचा एकत्रित खर्च ही मोठी रक्कम आहे. तरीही शमीची आर्थिक ताकद पाहता, तो हा खर्च सहजपणे पार पाडू शकेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय