सांगली : नवऱ्याकडून शारीरिक संबंधाची मागणी, दुसऱ्या बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; लग्नाच्या १५ दिवसानंतरच..

सांगली (13 जून) – मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच सांगली जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ १५ दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या महिलेनं आपल्या पतीचा(Husband ) कुऱ्हाडीने वार करून जागीच खून केला. राधिका (वय २७) असे आरोपी पत्नीचे नाव असून अनिल (वय ५६) हा मृत पती आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये (Husband )शारीरिक संबंधावरून वाद झाला. अनिल वारंवार संबंध ठेवण्याचा आग्रह करत होता. मात्र, राधिका त्यास सातत्याने विरोध करत होती. या गोष्टीचा राग मनात धरून बुधवारी पहाटे १२:३० च्या सुमारास अनिल झोपलेला असताना, राधिकाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार केले.

हल्ल्यानंतर घाबरलेल्या राधिकाने ही संपूर्ण घटना आपल्या चुलत भावाला सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून, राधिकाला अटक केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अनिलचा पहिला विवाह होता, मात्र त्याची पहिली पत्नी कर्करोगाने मरण पावली होती. त्यानंतर त्याने राधिकाशी विवाह केला होता. मात्र नव्या वैवाहिक आयुष्यात पतीच्या वर्तनामुळे राधिकामध्ये अस्वस्थता वाढत गेली, आणि अखेर तीने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी राधिकाविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३ मधील बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

हेही वाचा :