उत्तराखंडमधील देहरादूनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (repeatedly)एका विवाहित महिलेने पती आणि सासऱ्यांविरोधात बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तसेच तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. ब्लॅकमेल करून आरोपीने पीडितेसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्या सासऱ्यानेही पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२० साली पीडित महिला अल्पवयीन असताना तिची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. काही दिवसांनंतर आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये सतत बोलणं व्हायचं, आणि २१ डिसेंबर २०२० रोजी आरोपी पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला. (repeatedly)तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले. व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून आरोपीने वारंवार पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला दिल्लीला घेऊन गेला आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. लग्नानंतरही आरोपी पीडितेच्या मनाविरूद्ध लैंगिक अत्याचार करीत राहिला. इतकंच नाही तर, आरोपी घराबाहेर असताना त्याच्या वडिलांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असा आरोप पीडितेने तिच्या सासऱ्यांवर केला आहे.
१० एप्रिल रोजी पीडित महिला त्यांच्या तावडीतून सुटून आपल्या काकांच्या घरी गेली. तिने सगळी आपबिती आपल्या घरच्यांना सांगितली. सध्या ती मानसिक आणि शारीरिक त्रासातून सावरत असून उपचार सुरू आहेत. या गोष्टीला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(repeatedly)पटेल नगर कोतवालीचे प्रभारी निरीक्षक हरिओम चौहान यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पती आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :
आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना… संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या
मोठी बातमी ! अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? शिंदे गटाच्या नेत्याचे संकेत