आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना… संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस(political updates) पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं, असं विधान केलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावर आता खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं.

जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत, त्यांना बरोबर घेऊ अन्यथा त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच ठेऊ, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. फटे लेकीन हटे नाही ही आमची भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आम्हाला मधल्या काळात शरद पवार(political updates) आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी वाटले होते की, आता संघर्ष सुरू राहील. आमचा देखील संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात पवार साहेबांचा अपमान केला, त्याची आम्हाला खंत वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो, असं राऊत म्हणाले.

शरद पवारांनी त्यांचा संघर्ष संपवला आहे का, असा सवाल केला असता राऊत म्हणणाले, मला तसं वाटत नाही. पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. फटे लेकीन हटे नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही सत्तेची आणि संस्थाची पर्वा करत नाही, नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे.

पण आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही. आमचे राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे. जे येतील, ते आमच्यासोबत. नाहीतर त्यांच्याशिवाय… हा वीर सावरकरांचा मंत्र आहे. आला तर सोबत, नाहीतर तुमच्याविना संघर्ष सुरू राहणार, असं राऊतांनी म्हटलं.

राऊत म्हणाले, जे आमच्या सोबत यायला तयार आहेत, त्यांना सोबत घेऊ. नाहीतर त्यांच्याशिवाय, हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर कामं केलेली माणसं आहोत, असं राऊत म्हणाले. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकूमशाहीविरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला महाराष्ट्र कंगाल केला. मराठी अस्मितेविरुद्ध ज्यांचे कारस्थान सुरू आहेत, त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे; रोगप्रतिकारशक्ती, पचन आणि…

मोठी बातमी ! अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? शिंदे गटाच्या नेत्याचे संकेत