इचलकरंजी शहरातील आमराई रोडजवळील काळ्या ओढ्यात एका अनोळखी महिलेचा(woman) कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गावभाग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली असून, महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित महिलेचे (woman)वय अंदाजे ३० वर्षे असून तीने लेगिन्स व ड्रेस परिधान केलेला आहे. बुधवारी रात्री नागरिकांनी मृतदेह आढळल्याची माहिती गावभाग पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुरुवातीस मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेण्यात आला व त्यानंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी गुरुवारी सकाळी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, महिलेच्या शरीरावर कोणतेही मारहाणीचे किंवा घातपाताचे जखमा आढळून आलेल्या नाहीत. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांची नोंद तपासली जात आहे.
गावभाग पोलिस ठाण्याचे अधिकारी सांगतात की, “सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. तपासात मदत होण्यासाठी नागरिकांनी कुठल्याही बेपत्ता महिलेबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.”
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नवरीनं खाल्ला रसगुल्ला, हात धुण्याच्या बहाणा करून गेली प्रियकरासोबत पळून
एका नवऱ्यासाठी दोन बायकांची भांडणं! झिंज्या धरल्या, ओढत नेलं; व्हिडिओ व्हायरल