इचलकरंजी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कबनूर येथील बाळासो पाटीलनगरमध्ये दोघा भावांची घरे फोडली. (Kabanur) यामध्ये सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान घडली. याची फिर्याद सागर आनंदा चौगले (वय ३५, रा. बाळासो पाटीलनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भरवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

सागर चौगले आणि त्यांचे भाऊ अमोल चौगले यांची घरे शेजारी आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन्ही कुटुंबे बाहेरगावी गेली होती. चौगले कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. (Kabanur) चोरट्यांनी सागर चौगले यांच्या घरातील तिजोरी उचकटून १२.५ ग्रॅमचे मंगळसूत्र, चार ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, तीन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, चांदीचे ब्रेसलेट आणि ९० हजार रुपये रोख, असा २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.र अमोल चौगले यांच्या घरातून सोन्याच्या रिंगा, डूल, दोन सोन्याचे मनगट आणि दोन हजार रुपये रोख, असा ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा :
देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील
वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना