I am sorry आई तेजस्विनी पंडितच्या पोस्टने चाहत्यांच्याही डोळ्यात आणलं अश्रू?

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आईसाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झालं आहे. आईच्या आठवणीत तिने इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता. ज्योती चांदेकर यांच्या निधनाला आता वर्ष पूर्ण झालं असून त्यांची लेक तेजस्विनीने इन्स्टा स्टोरीमध्ये अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. आई आणि मुलीचं नातं हे कोणत्याही शब्दांच्या पलीकडचं असतं. (Tejaswini Pandit) आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जेव्हा आयुष्यात नसते, तेव्हा तिच्या आठवणी अधिक तीव्रतेने जाणवतात. तेजस्विनीच्या या पोस्टमधूनही आईच्या आठवणी तिच्या मनात किती खोलवर रुजलेल्या आहेत, हे समजतं.

तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षणसुद्धा ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतीच तिने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आईचा एक सुंदर फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिची आई निळ्या रंगाची साडी नेसून निवांतपणे पुस्तक वाचताना दिसत आहे. या सुंदर फोटोसोबत तेजस्विनीने लिहिलेला संदेश मनाला चटका लावणारा आहे. ‘आई.. एक वर्ष झालं. तुझ्याविना आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नाही. मला माफ कर, तुला थँक्यू म्हणता आलं नाही’, (Tejaswini Pandit) अशा शब्दांत तिने आईप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजी ही भूमिका घराघरात लोकप्रिय ठरली होती.

आईच्या निधनानंतर तेजस्विनीने पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आई काय बोलू.. अजून सिंक इन होत नाहीये गं तू नाहीस. आई तू ना प्रचंड हट्टी होतीस. किती वर्ष तुला सांगत होते की स्वत:च्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. (Tejaswini Pandit) पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहीस’, अशी भावनिक पोस्ट तिने लिहिली होती.

हेही वाचा :

धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?

तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?

कोल्हापुरातील आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधन?