भारत सरळ रस्त्यांनी चालला नाही तर पाकिस्तानची धमकी, थेट म्हटले, पराभव झाल्यानेच त्यांनी?

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. (Pakistan and India) त्यातच आता भारताने मोठी धमकी पाकिस्तानातून देण्यात आली. आम्हाला शांती पाहिजे, असल्याचे मोठे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले.

पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरोधात आग ओकताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली. पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानचे कंबरडे मोडले. (Pakistan and India) यादरम्यानच आता पाकिस्तानने थेट म्हटले की, आम्हाला शांती हवी आहे. पाकिस्तानला कोणी आव्हान देत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले. भारत जर सरळ रस्त्याने चालत नाही तर आम्हालाही उत्तर द्यावे लागेल म्हणत त्यांनी धमकी दिली. जर भारताकडून आव्हान दिले जात असेल तर त्यांना 2025 पेक्षाही घातक उत्तर दिले जाईल.

शरीफ यांनी डोक्यातून मुंग्या येणारा दावा केला. शरीफ यांनी म्हटले की, भारताचा पराभव झाल्याने त्यांनी सिंधु जल करार स्थगित केला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने जल सिंधू करार स्थगित केला. पाकिस्तानच्या नेत्यांनीही मान्य केले की, त्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, तोंडावर पडल्यानंतरही पाकिस्तानचा माज काही कमी होत नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताच्या हल्ल्यांना घाबरून पाकिस्तानने अमेरिकेचे पाय पकडले होते आणि आता बोलले जातंय की, भारताचा पराभव झाला. भारताचा पराभव झाल्यानेच भारताने सिंधु जल करार स्थगित केला. पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे केंद्र उद्धवस्थ करण्यात आली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र उडवून दिली.

त्यानंतर पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी भारताने सिंधु जल करार स्थगित केला. ज्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळतोय. (Pakistan and India) त्यातच आता पुन्हा धमकी देण्यात आली. पाकिस्तानमध्ये मोठा अंसतोष लोकांमध्ये आहे. महागाई आणि बेरोजगारी यामुळे लोक रस्त्यावर उतरत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर स्थिती अधिक खतरनाक आहे. लोक मोठे आंदोलने करत आहेत. आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जात आहे. त्यात भारताला धमक्या देताना पकिस्तान दिसतोय.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?