भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘क्रिकेटचा दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुलीच्या आयुष्यावर आधारित जीवनावर बायोपिक(biopic) बनणार आहे.

सौरव गांगुली हा केवळ भारतीय क्रिकेटच्या इतिहासातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. बायोपिकसाठी मुख्य भूमिकेसाठी नाव आता निश्चित झालं आहे. कोण दादाची भूमिका साकारणार याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. आता अखेरीस एक नाव निश्चित करण्यात आलं आहे.
या बायोपिकमध्ये(biopic) राजकुमार राव हा बॉलिवूड अभिनेता सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहेत. स्वतः राजकुमार रावने एनडीटीव्हीशी बोलताना यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याने हे ही सांगितलं की, तो या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे, पण त्याचबरोबर ही मोठी जबाबदारी असल्याने थोडासा नर्वसही आहे.
राजकुमार राव म्हणाला, “हो, मी ही भूमिका करतोय. ही खूप मोठी जबाबदारी आहे, पण त्याचवेळी एक जबरदस्त अनुभवदेखील असणार आहे. मी बंगाली अॅक्सेंटवरही मेहनत घेणार आहे.”
सौरव गांगुलीनेदेखील या निवडीला दुजोरा दिला आहे. त्याने म्हटलं, “राजकुमार रावची निवड झाली आहे आणि मला वाटतं, माझी भूमिका निभावण्यासाठी तोच सगळ्यात योग्य आहे.” पुढे तो म्हणाला, “माझ्या बायोपिकसाठी योग्य व्यक्ती निवडली गेली आहे. मी त्याला पूर्ण मदत करणार आहे.”

गांगुलीने पुढे सांगितलं की, या बायोपिकचं(biopic) शूटिंग जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि चित्रपट डिसेंबर 2026 मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
गांगुलीने 1992 ते 2008 दरम्यान भारतीय संघासाठी क्रिकेट खेळलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली. आता त्याची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.
हेही वाचा :
मार्केट स्टाईल सर्वांच्या आवडीचा लसूण चिवडा आता घरीच बनवा; व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी
वरात राहिली मागे अन् नवरदेवाला घेऊन घोडी फरार; पाहा नेमंक काय घडलं? Video Viral