आपल्यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना ऋतू कोणताही असो(coffee) पण रोज कॉफी प्यायला खूप आवडते. बऱ्याचदा लोकांना कोल्ड कॉफी कॅफे मध्ये जाऊन प्यायला खूप आवडते. त्यातच कॅफेमध्ये मिळणारी कॉफी ही महाग असते, त्यामुळे रोज रोज जाऊन कॉफी पिऊ शकत नाही. तसेच ही कोल्ड कॉफी केवळ पोटातील उष्णता कमी करत नाही तर शरीरालाही थंड ठेवते. बरेच लोकं एकाच प्रकारे कोल्ड कॉफी बनवतात. दररोज तीच कोल्ड कॉफी पिणे थोडा कंटाळा देखील येतो. यासाठी तुम्ही कोणत्याही ऋतूत अनेक फ्लेवर्सची कोल्ड कॉफी बनवू शकता. यामुळे तुम्हाला एक नवीन चव तर मिळेलच, पण सर्वांना ती खूप आवडेल. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला 3 फ्लेवर्सची कोल्ड कॉफीबद्दल सांगणार आहोत. तुम्ही ती तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी बनवू शकता, चला तर मग जाणून घेऊयात…

जर तुम्हाला गोड आणि क्रिमी कॉफी आवडत असेल तर व्हॅनिलापासून बनवलेली कोल्ड कॉफी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ती बनवण्यासाठी, एक कप थंड दुधात (coffee)एक चमचा इन्स्टंट कॉफी, दोन चमचे साखर, एक चमचा व्हॅनिला एसेन्स आणि बर्फाचे तुकडे मिसळा. आता हे सर्व मिश्रण मिक्सच्या भांड्यात एकत्र करा. काही मिनिटातच व्हॅनिला फ्लेवर्ड कोल्ड कॉफी तयार. ते एका ग्लासमध्ये काढा आणि चॉकलेटने सजवा.
चॉकलेट कोल्ड कॉफी देखील खूप लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात जास्त करून ही कॉफी प्यायली जाते. कारण ही कॉफी प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटते. तर ही कॉफी बनवण्यासाठी, तुम्हाला दोन कप दुधात दोन चमचे कॉफी पावडर, एक चमचा पाणी, एक चमचा क्रीम, एक तुकडा डार्क चॉकलेट आणि एक स्कूप आईस्क्रीम मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून ग्राइंड करा. कॉफी तयार झाल्यावर आईस्क्रीम
जेव्हा कोणी हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाते तेव्हा तो नक्कीच कॅरेमल कोल्ड कॉफी ऑर्डर करतो. तुम्ही ती घरी देखील बनवू शकता. यासाठी, एक कप थंड दूध, एक टेबलस्पून इन्स्टंट कॉफी, (coffee)दोन टेबलस्पून कॅरेमल सिरप, एक टेबलस्पून साखर आणि बर्फाचे तुकडे एकत्र मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करा. त्यानंतर ते एका ग्लासमध्ये काढा आणि वर कॅरेमल सिरप टाकून सजवा.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..