‘गाड्या फोडायच्या तर पवार, ठाकरे, फडणवीसांच्या फोडा’; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

चिल्लरांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या(cars) फोडा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा आज परभणीमध्ये दाखल झाली. यावेळी जाहीर सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर थेट भाष्य केलंय.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात सध्या गाड्या(cars) फोडल्या जात आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना जरा आवर घाला, चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता, तुम्हाला जर गाड्याच फोडायच्या असतील तर मी नावं सांगतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा म्हणजे हे लोकं पोपटासारखे बोलू लागतील की आम्ही कोणाच्या बाजूने आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे. लोकांना आरक्षण संविधानाच्या कलमांमधून सरकार देणार आहे. दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चुकीचं हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, पण जनतेच्या हातात फक्त मतदान देण्याचं आहे. त्यामुळे भडकाऊ राजकारण्यांपासून सावध रहा, त्यांच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण वातावरण बिघडू देऊ नका हाच या यात्रेचा उद्देश असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलयं.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आलायं. मराठा समाजाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करावं, अन् ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं दोघांनीही एकमेकांना मतदान करण्याच्या भानगडीत पडू नये, कोणीतही निवडून येईलच. जो निवडून आला तो राज्य करणार आहे, त्यानंतर तो ठरवणार आहे की आरक्षण द्यायचं की नाही. राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार मतदारराजाचा असतो, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय.

राज्यात नुकतीच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मिटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारली असून या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

हेही वाचा :

 कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे

खुशखबर! आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म फक्त ५ मिनिटातच भरता येणार

पाचशे, हजार रुपयांत नव्हे तर अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’